चाकण येथील ATM चोरीचे CCTV फुटेज आले समोर...

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते की, दोन्ही चोर दुचाकीवर आले असून, एक चोर दुचाकीवर बसलेला आहे.

पुणे : चाकण एमआयडीसी परिसरातील एटीएममध्ये स्फोट करून चोरांनी एटीएममधील बॉक्स घेऊन पळ काढला. धक्कादायक म्हणजे यावेळी चोरट्याने सीसीटीव्हीकडे पाहून सॅल्यूट केला आहे.

चाकण परिसरात ATM सेंटरमध्ये अचानक स्फोट...

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते की, दोन्ही चोर दुचाकीवर आले असून, एक चोर दुचाकीवर बसलेला आहे. दुसरा चोर एटीएममधून पैशांना बॉक्स घेऊन येतो आणि ते घेऊन तो गाडीच्या मागच्या बाजूला बसतो. यादरम्यान गाडी चालविणाऱ्या चोराने सीसीटीव्हीच्या दिशेने हातवारे केले. त्याने चक्क सीसीटीव्हीकडे बघून सॅल्यूट केल्याचे दिसत आहे.

एक ब्लास्ट आणि ATM मधून 7 लाख लंपास; पुण्यातील चोरीचं CCTV फुटेज आलं समोर

पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची मोठी कारवाई...

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसी परिसरामधील भांबोली गावात हिताची कंपनीचे एटीएम आहे. आज मध्यरात्री 1 च्या सुमारास या एटीएममध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली. विशिष्ट प्रकारच्या स्फोटकांनी हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज पोलिसांनकडून वर्तवला जात आहे. या स्फोटामध्ये एटीएम ATM मशिनचा अर्धा भाग फुटला असून, सुमारे 6 ते 7 लाख रुपये रक्कम चोरट्यांनी लांपास केली आहे. यादरम्यान, स्फोटाचे नेमकं काय कारण शोधण्यासाठी डॉग पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले. तर पुढील तपास बॉम्ब शोधक आणि पोलिस प्रशासन करत आहेत.

राज कुंद्रा याच्याबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune chakan atm blast cctv footage of the theft in came came
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे