Video: महिला वाहतूक पोलिसावर शुभेच्छांचा वर्षाव...

पुणे शहरात भरपावसात एका महिला वाहतूक पोलिसाने वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, म्हणून रस्त्यालगत साचलेल्या पाण्याचा निचरा केला.

पुणे : पुणे शहरात भरपावसात एका महिला वाहतूक पोलिसाने वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, म्हणून रस्त्यालगत साचलेल्या पाण्याचा निचरा केला. ड्युटीवर असताना आपले कर्तव्य पार पडले. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

पी. एन. साबळे असे या महिला वाहतूक पोलिसाचे नाव आहे. सहकारनगर शाखेमध्ये त्या कर्तव्यावर आहेत. पुण्यात शुक्रवारी जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे महिला वाहतूक पोलिसाने स्वतःच पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, महिला पोलिस कर्मचारीने पाणी हटवण्यासाठी एका झाडाच्या फांदीची मदत घेतली. अनेकदा रस्त्यावरील कचऱ्यामुळे गटारात पाणी तुंबते आणि रस्त्यावर साचते. ही महिला वाहतूक पोलिस फांदीच्या मदतीनेच तु्ंबलेल्या गटाराला साफ करुन पाण्याचा निचरा करता दिसत आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केलेल्या कृतीला सोशल मीडियातून अनेकांनी सॅल्यूट ठोकला आहे.

Video: देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच लाठीचार्ज; कारण...

Video: पोलिसकाकांनी गणेश विसर्जनादरम्यान मनसोक्त केला डान्स...​

Video: पुणे शहरातील स्वारगेट पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान धरला ठेका...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रुग्णवाहिकेला दिला रस्ता मोकळा करून...

माणूस उभा आहे वर्दीतला; म्हणून सणसाजरा होतोय गर्दीतला...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune ady traffic police constable who was working in rains w
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे