मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका विशेषांकाचे प्रकाशन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'पोलिसकाका विशेषांका'चे रामगिरी बंगल्यावर सोमवारी (ता. २६) प्रकाशन करण्यात आले.

नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'पोलिसकाका विशेषांका'चे रामगिरी बंगल्यावर सोमवारी (ता. २६) प्रकाशन करण्यात आले. ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.com या वेबसाईटच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेषांकाचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'पोलिसांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेण्याचे काम पोलिसकाका वेबसाईट करत आहे. 'पोलिसकाका विशेषांका'च्या माध्यमातून अधिकाऱयांचा प्रवास आणि पोलिसांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांसह पोलिस दलात येणाऱयांना हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल.'

पुस्तक प्रकाशनावेळी पोलिसकाकाचे संपादक संतोष धायबर, बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहर व जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, पत्रकार संदीप कद्रे, महेश बुलाख आदी उपस्थित होते. पोलिसांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन बातम्या, लेख, व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणारी आणि पोलिसांसाठी पोलिसकाका वेबसाईट काम करत आहे. वेबसाईटच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि डॉक्टरांचे लेख आहेत. संतोष धायबर यांनी विशेषांकाबद्दल माहिती दिली तर अजय भोसले यांनी आभार मानले.

दरम्यान, पोलिस अधिकाऱयांनी शुन्यातून विश्व निर्माण करून पोलिस दलात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. संबंधित विशेषांकामध्ये सविस्तर अशा मुलाखती देण्यात आल्या आहेत. विशेषांकामध्ये पुढील अधिकाऱयांचे लेख आहेत.

'पोलिसकाका'कडून MPSC/UPSC विद्यार्थ्यांसह वाचकांसाठी पुस्तक नोंदणी...

पोलिस अधिकारीः
अमिताभ गुप्ता : आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
पौर्णिमा तावरे : व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे पाहिले स्वप्न!
रमेश धुमाळ : अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
अशोक इंदलकर : लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
क्रांतीकुमार पाटील : कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
प्रताप मानकर : कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी!
अरविंद माने : अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
शब्बीर सय्यद : कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
प्रवीण काळुखे : शिस्तप्रिय अधिकारी!
विश्वास डगळे : 'दबंग' अधिकारी!
कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!
अर्चना पाटील : पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
अनिता हिवरकर : जिद्द, ध्येयाला गवसणी घालणाऱ्या 'दबंग' अधिकारी!
प्रियांका काळे : जिद्दीला सलाम!
अशोक कदम : आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
अनिकेत पोटे : 'फिटनेस'बाबत दक्ष अधिकारी!
अंकुश कर्चे : जिद्द आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा अधिकारी!
विजयकुमार शिंदे : एक प्रेरणदायी प्रवास आणि थरारक अनुभव!
सोमनाथ वाघमोडे : यशाला गवसणी घालणारा अधिकारी!

डॉक्टरः
१) डॉ. अविनाश भोंडवे : पोलिसांमधील ताणतणाव कारणे, परिणाम आणि नियोजन...
२) डॉ. जयश्री तोडकर : पोलिसांचे आरोग्य महत्त्वाचे!
3) डॉ. ऋतुपर्ण शिंदे: पोलिसांचे हृदयारोग्य कसे जपाल आपले हृदय?
४) डॉ. अंकुश लवांडे : पोलिसांच्या आरोग्याविषयी बोलूया...
५) डॉ. शुभदा जोशी : पोलिसांमधील आजार आणि उपाय!
६) डॉ. प्रशांत बोठे : पोलिस आणि गुडघ्याचे आजार!

'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

'पोलिसकाका विशेषांक' नोंदणीसाठी खालील फॉर्म भरा.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: policekaka special book publish cm eknath shinde at nagpur a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे