पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!

सहाय्यक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे. त्यांच्याविषयी थोडक्यात...

पुणेः ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. 

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत.  प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका विशेषांकाचे प्रकाशन!

पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सांगवी गाव. शेतकरी आणि एकत्रित कुटुंबातील जन्म. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण. खेळाची पहिल्यापासून आवड. अकरावीमध्ये असताना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. अभ्यास केला आणि यश प्राप्त केले. त्या अधिकारी म्हणजे सहाय्यक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे. त्यांच्याविषयी थोडक्यात...

पौर्णिमा तावरे यांचा शेतकरी कुटुंबातला जन्म. घरचे एकत्रित कुटुंब. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झाले. शाळेमध्ये असताना कबड्डी आणि बुद्धीबळ खेळाची आवड होती. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच बालपण आणि शिक्षण सुरू होते. २००४ मध्ये दहावीची परीक्षा दिली आणि ७० टक्के गुण मिळाले. दहावीनंतर ११ वी १२ चे शिक्षण बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयात तर कृषी महाविद्यालयातून २०१० मध्ये बी.एस्सी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले. 

माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे  व्याख्यान...
बारामती येथे शिक्षण सुरू असताना विविध अधिकाऱ्यांचे व्याख्यान आयोजित केले जायचे. अनेकांच्या व्याख्यानामधून प्रेरणा मिळत असे. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान ऐकले आणि एक उर्जा मिळाली. व्याख्यान ऐकल्यानंतर क्लास वन अधिकारी होण्याचे ठरवले. मनाचे परिवर्तन 
झाले. वाचनाची आवड तर पहिल्यापासूनच होती. पण, व्याख्यान ऐकल्यानंतर पुढे काय करायचे आणि त्यासाठी काय करायला हवे, यासाठी योग्य दिशा मिळाली.

एमपीएससीचा अभ्यास...
पुढे काय व्हायचे आहे, हे तर ठरवले होते. मग त्यादृष्टीने अभ्यास करून पुढे जायचा निश्चय केला. बीएस्सी अॅग्रीचे २०१० मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल २०१२ मध्ये लागला आणि उत्तीर्ण झाल्या. कुटुंबासह त्यांनाही मोठा आनंद झाला...

सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा...

'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱयांचे लेख समाविष्ट आहेत...

अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!

रमेश धुमाळ : अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!

पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...​

अशोक इंदलकर : लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
क्रांतीकुमार पाटील : कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
प्रताप मानकर : कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी!
अरविंद माने : अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
शब्बीर सय्यद : कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
प्रवीण काळुखे : शिस्तप्रिय अधिकारी!
विश्वास डगळे : 'दबंग' अधिकारी!
कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!
अर्चना पाटील : पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
अनिता हिवरकर : जिद्द, ध्येयाला गवसणी घालणाऱ्या 'दबंग' अधिकारी!
प्रियांका काळे : जिद्दीला सलाम!
अशोक कदम : आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
अनिकेत पोटे : 'फिटनेस'बाबत दक्ष अधिकारी!
अंकुश कर्चे : जिद्द आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा अधिकारी!
विजयकुमार शिंदे : एक प्रेरणदायी प्रवास आणि थरारक अनुभव!
सोमनाथ वाघमोडे : यशाला गवसणी घालणारा अधिकारी!

डॉक्टरः
१) डॉ. अविनाश भोंडवे : पोलिसांमधील ताणतणाव कारणे, परिणाम आणि नियोजन...
२) डॉ. जयश्री तोडकर : पोलिसांचे आरोग्य महत्त्वाचे!
3) डॉ. ऋतुपर्ण शिंदे: पोलिसांचे हृदयारोग्य कसे जपाल आपले हृदय?
४) डॉ. अंकुश लवांडे : पोलिसांच्या आरोग्याविषयी बोलूया...
५) डॉ. शुभदा जोशी : पोलिसांमधील आजार आणि उपाय!
६) डॉ. प्रशांत बोठे : पोलिस आणि गुडघ्याचे आजार!

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: policekaka book pune acp pornima taware interview in book po
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे