पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत.

पुणेः ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. 

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत.  प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका विशेषांकाचे प्रकाशन!

पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. ऐन उमेदीच्या काळात अचानक हरवलेले पित्रुछत्र. वेळेच्या आधीच खांद्यावर पडलेल्या जबाबदा-या, तरीही सगळा खडतर प्रवास पार करून आज पोलिस उप अधीक्षक असलेल्या व कोल्हार गावातीलच नव्हे तर राहुरी तालुक्यातील (जि. अहमदनगर) पहिली फौजदार असलेल्या अर्चना पाटील-फुलसुंदर यांची ही संघर्ष गाथा. त्यांच्याविषयी थोडक्यात...

अर्चना यांचे वडीलांचे मुळ गाव कोल्हार खुर्द. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. आई गृहीणी तर वडील प्रवरा सहकारी साखर कारखान्यात नोकरीला. पाठीवर एक भाऊ व दोन बहीणी. अर्चनाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोल्हार येथे झाले. पाचवी ते दहावी पर्यंत रयत शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कुल कोल्हार येथे तर बी एस्सी व एम एस्सी कृषी हे कृषी महाविद्यालय, पुणे येथे झाले. पदवीच्या शेवटच्या वर्षात असतानाच अचानक वडीलांचे अपघातात निधन झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही अशा परिस्थितीत अर्चनाची आई अनुराधा सदाशिव पाटील यांनी स्वतःला सावरुन आपल्या चारही मुलांचे राहिलेले शिक्षण जिद्दीने पुर्ण केले व त्यांना घडवले.

अर्चना यांनी आपल्या आईच्या मदतीने पुढील शिक्षण पुर्ण केले व एम एस्सी नंतर लगेच कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी सुरु केली....

सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा...

'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱयांचे लेख समाविष्ट आहेत...

अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!

रमेश धुमाळ : अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!

पौर्णिमा तावरे : व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे पाहिले स्वप्न!
अशोक इंदलकर : लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
क्रांतीकुमार पाटील : कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
प्रताप मानकर : कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी!
अरविंद माने : अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
शब्बीर सय्यद : कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
प्रवीण काळुखे : शिस्तप्रिय अधिकारी!
विश्वास डगळे : 'दबंग' अधिकारी!
कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!
अर्चना पाटील : पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
अनिता हिवरकर : जिद्द, ध्येयाला गवसणी घालणाऱ्या 'दबंग' अधिकारी!
प्रियांका काळे : जिद्दीला सलाम!
अशोक कदम : आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
अनिकेत पोटे : 'फिटनेस'बाबत दक्ष अधिकारी!
अंकुश कर्चे : जिद्द आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा अधिकारी!
विजयकुमार शिंदे : एक प्रेरणदायी प्रवास आणि थरारक अनुभव!
सोमनाथ वाघमोडे : यशाला गवसणी घालणारा अधिकारी!

डॉक्टरः
१) डॉ. अविनाश भोंडवे : पोलिसांमधील ताणतणाव कारणे, परिणाम आणि नियोजन...
२) डॉ. जयश्री तोडकर : पोलिसांचे आरोग्य महत्त्वाचे!
3) डॉ. ऋतुपर्ण शिंदे: पोलिसांचे हृदयारोग्य कसे जपाल आपले हृदय?
४) डॉ. अंकुश लवांडे : पोलिसांच्या आरोग्याविषयी बोलूया...
५) डॉ. शुभदा जोशी : पोलिसांमधील आजार आणि उपाय!
६) डॉ. प्रशांत बोठे : पोलिस आणि गुडघ्याचे आजार!

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: policekaka book dysp cid archana patil fulsunder interview o
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे