Video: पोलिसाने महिलेला जवळ घेत केला किस पण...

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस मास्क काढून त्या महिलेला किस करत आहे.

पेरूः एका महिलेने कोरोनाचा नियम तोडल्याबद्दल पोलिसांनी तिच्याकडून दंड आकरण्याऐवजी किस घेतला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसाला निलंबीत करण्यात आले आहे.

Live सुरू असतानाच दारू पिताना गेला जीव...

कोरोनाच्या वाढत्या प्रसारात संसर्ग टाळण्यासाठी नियम पाळण्याचे वारंवार आवाहन केलं जात आहे. नियम मोडणाऱ्याला शिक्षासुद्धा केली जात आहे. अशात कोरोनाचे नियम न पाळलेल्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेनं कोरोनाचे नियम तोडल्यानंतर तिला दंड आकारण्याऐवजी पोलिसांनी तिला किस करून सोडून दिले. रस्त्यावरच्या सीसीटिव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मैत्रिणीचा दंड भरला पत्नीच्या क्रेडीट कार्डवरून अन्...

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सुरूवातीला महिलेची माहिती पोलिस कर्मचारी लिहीताना दिसून येत आहे. याचदरम्यान तो पोलिस महिलेच्या जवळ येतो आणि काही सेकंदातच किस करतो. मिराफ्लोरेस जिल्ह्यातील सुरक्षा अधिकारी Ibero Rodriguez यांनी सांगितले की, ही घटना समोर आल्यानंतर सदर दोषी पोलिसाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस मास्क काढून त्या महिलेला किस करत आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा...

जवान चंदू चव्हाण

Title: police suspended after kissing woman at peru video viral
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे