वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांचे वारीदरम्याचे अनुभव...
स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर हे २५ वर्षे महाराष्ट्र पोलिस दलात आहेत.स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर हे २५ वर्षे महाराष्ट्र पोलिस दलात आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान अनेकदा ते बंदोबस्तामध्ये सहभागी झाले आहेत. वारीदरम्यान त्यांना वेगवेगळे अनुभव आले असून, त्यातील काही निवडक अनुभव त्यांनी सांगितले आहेत....
महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावतामाळी अशा अनेक संतांचा समावेश आहे. आयुष्य जगण्यासाठी लागणारी मुल्ये, विचार, आचार, चांगुलपणा, सामाजिक बांधिलकी याचे संस्कार आपल्या मराठी मातीत आले ते या संतांच्या शिकवणी मुळेच. आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे भाविक संख्येने सहभागी होत असतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो. तो अनुभवयला मिळणे हे सुद्धा एक भाग्यच असते. पोलिस दलात असल्यामुळे मला बंदोबस्ताच्या निमित्ताने अनेकदा अनुभवायला मिळाले, ही मी एक भाग्यच समजतो.
भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला...
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्यांसह निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेवादी संतांच्या पालखी सोहळ्यांची गावोगावी आबालवृद्धांना प्रतीक्षा लागते. वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या पालख्या प्रस्थान ठेवतात आणि अवघ्या महाराष्ट्राची पावले पंढरपुरकडे जणू धाव घेऊ लागतात. डोईवर तुळशीवृंदावन, भाळी गंध-बुक्का आणि पायी समान ठेका धरत, फुगड्या खेळत दिंड्या पंढरीच्या दिशेने जातात. पाऊस झेलत, उन्हाची तमा न बाळगता कुणाच्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या तत्त्वानुसार ‘एक तरी वारी अनुभवावी’ या भावाने सहभागी होतात.
चॅलेंज स्वीकारणं हे माझ्या रक्तात: अशोक इंदलकर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक)
पोलिस बंदोबस्त म्हटल्यावर इतर ठिकाणी किती गोंधळ असतो, हे अनेकदा पाहायला मिळते. पण, पालखी सोहळ्यादरम्यान पुर्णपणे विरुद्ध बाजू पाहायला मिळते. पालखीमध्ये सहभागी होणारा प्रत्येकजण माऊली, माऊली म्हणून एकमेकांसोबत संबोधतो. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यामुळे पोलिसांच्या मनावरील ताण कितीतरी प्रमाणात कमी होत असतो. पालखी सोहळ्यादरम्यान बंदोबस्त मिळणे, हे मोठे भाग्यच समजतो. मला अनेकदा असे भाग्य अनुभवायला मिळाले आहे.
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक? : अशोक इंदलकर
सुमारे सातशे वर्षांपूर्वी ‘भूतां परस्परे जडो मैत्र जिवांचे’ हे दान ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाकडे मागितले होते, तेच दान देवाने ज्ञानेश्वरांच्या पालखीत भरभरून टाकले होते. आज अनेक अनाथ निराधार कुटुंबांना सनाथ करण्यासाठी ‘मैत्र जिवांचे’ लाभावे, ही अपेक्षा आहे. कवी विंदा करंदीकर दात्याची सुंदर कल्पना व्यक्त करीत पुढील भावना व्यक्त करतात.
देणाऱयाने देत जावे । घेणाऱयाने घेत जावे ।
घेता घेता एक दिवस । देणाऱयाचे हात घ्यावे ।।
निराधाराला दिलेला आधार ही आज ईश्वराची पूजा आहे आणि त्यानेच जनताजनार्दन प्रसन्न होणार आहे. असाच एक अनुभव आला आहे...
इतिहास पोलीस दल निर्मितीचा... (अशोक इंदलकर)
माऊलींनी नाकारली चप्पल...
एक वर्षी पालखी सोहळ्यामध्ये बंदोबस्तासाठी सहभागी झालो होतो. बंदोबस्ताचा ताण तर मुळीच नव्हता. माऊलींमध्ये सहभागी होऊन कर्तेव्य पार पाडत होतो. बंदोबस्तामध्ये असल्यामुळे सोबत पोलिसांची गाडी होती. पालखी सोहळ्यादरम्यान चालून चालून दोन माऊलींच्या पायांची अवस्था बिकट झाली होती. शिवाय, त्यावेळी ऊन्हाचा कडाका होता. माझ्या गाडीमध्ये एक चप्पलचा जोड होता. माऊलींकडे गेलो.... माऊली ही घ्या चप्पल. तुम्ही दोघी जरी असला तरी माझ्याकडे एकच चप्पलचा जोड आहे, ही घ्या. माऊलींनी चप्पलचा जोड घेण्यास नकार दिला. आम्ही माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी झालो आहोत. पंढरपूरपर्यंत चालत जाणार आहोत. या सोहळ्यादरम्यान कितीही चाललो तरी काही जाणवत नाही. उलट एक ऊर्जा मिळते असे म्हणून अक्षरशः त्यांनी चप्पल नाकारली. मनाचा केवढा तो मोठेपणा...
'त्या' माऊलीकडे पाहून मला खूप वाईट वाटले...
एक विचार मनात येऊन गेला. पालखी सोहळ्यादरम्यान चालल्यामुळे दोघींच्या पायांची अवस्था बिकट झाली होती. तरीही त्यांना देऊ केलेली चप्पल नाकारली. खरंच, पाडुंरंगावर किती मोठी श्रद्धा आहे. एरवी चालताना एक खडा जरी टोचला तरी वेदना होतात. पण, पालखी दरम्यान किती तरी भाविक अनवाणी पायाने चालताना दिसतात. एवढी शक्ती येते कोठून? खरंच एक अदभूत शक्ती आहे.
माझा मराठाचि बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।,
संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत, असे कधी होत नाही.
पालखी सोहळ्यादरम्यान पाहिले तर वेळ असतोच. कारण प्रत्येक भाविक हा माऊली... माऊली... जयघोष करत पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असतो. माऊलींची शिस्त पाहायला मिळते. त्यामुळे बंदोबस्ताचा ताण फार काही नसतो. आळंदीमध्ये असताना अथवा दुसरकडी बंदोबस्त असताना माऊलींची अथवा अनेक धार्मिक पुस्तके वाचायला मिळतात. एरवी वेळ कमी असतो. पण, याकाळामध्ये वाचलेल्या पुस्तकांमुळे किती तरी माहिती मिळते आणि त्यामधून मिळणारा आनंद हा किती तरी वेगळा असतो. पोलिस दलात असलो तरी लेखन हा माझा पिंड आहे. मी, अनेक पुस्तके लिहीली आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान मला वाचनामधून ज्ञान मिळते, हा एक माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे.
विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी ।
विठ्ठल तोंडी उच्चारा ।।
विठ्ठल अवघा, भांडवला ।
विठ्ठल बोला विठ्ठल।।’
पंढरपूरच्या वाळवंटात सारी भक्त मंडळी भेदाभेद विसरून एक होताना दिसतात. हृदयातील पांडुरंगाला आलिंगन देऊन ते एकमेकांना हृदयी धरू लागतात. साऱया वारकरयांच्या भावविश्वात विठ्ठल एकरूप होऊन मुक्तपणे नाचू-गाऊ लागतात. या आनंदाच्या डोहात भक्तांना आपले स्वत्व गवसते. टाळ-चिपळ्यांच्या ठेक्यावर तनमन ठेका धरते. एकदा का पांडुरंगाचे दर्शन झाले की बास... ध्यन पावलो... असे वाटते.
कोरोनामुळे दोन वर्षे पालखी सोहळा बंद होता. पण, पंढरपूरमध्ये बंदोबस्ताची जबाबदारी असल्यामुळे पंढरपूरमध्ये होतो. याकाळात पांडुरंगाचे जवळून दर्शन घेता आले. धन्यधन्य झाहलो... पांडुरंगा कोरोनाला लवकर संपव, हे साकडे घातले. यंदा कोरोनाची भिती काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पालखी पंढरपूरला जाणार आहे. लाखो भाविकांना पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे. शिवाय, आम्हालाही यावर्षी सुद्धा एक वेगळा अनुभव घेता येणार आहे...
‘पंढरीसी जावे ऐसी माझे मनी ! विठाई जननी भेटे केव्हा !!
संपता सोहळा ना आवडे मनाला लागला टिळा पंढरीचा !!’
- अशोक इंदलकर, ashokindalkar66@gmail.com
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट, पुणे.