पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आज (शुक्रवार) संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आज (शुक्रवार) संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या असल्याचे मोदी म्हणाले. तसेच माझ्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आजच्या संबोधनात संदेशात शेतकऱ्यांच्या योजनांबाबत महत्त्वाची दिली. गेल्या 4 वर्षांत 1 लाख कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तसंच केंद्र सरकारचं कृषी बजेट पहिल्यापेक्षा 5 पटीनं वाढल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट जमा केले. अधिकाधिक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिल्याचंही त्यांनी सांगितले.

100 पैकी 80 शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे. शेतकऱ्यांसाठी कृषीकर्ज दुप्पट केलं. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठीच तीन कृषी कायदे आणले. पंतप्रधानांकडून कृषी कायद्यांचं कृषी प्रदर् पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असतील. पण उत्तर प्रदेशला रवाना होण्यापूर्वी त्यांना देशाला संबोधित केलं. पीएमओनं या संदर्भातलं ट्विट करुन माहिती दिली होती. असा असेल मोदींचा उत्तर प्रदेश दौरा दोन दिवसांपूर्वी पीएम मोदी राज्याच्या पूर्वांचलच्या दौऱ्यावर होते आणि तेथे त्यांनी अनेक विकास योजनांचे उद्घाटन केलं. तसंच नवीन योजनांची पायाभरणी केली. दरम्यान आज पीएम मोदी बुंदेलखंडच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी झाशी आणि महोबामध्ये मोठ्या योजना सुरू करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी अनेक योजना आणि प्रकल्प सुरू करणार आहेत. त्यानंतर मोदी लखनऊला जातील आणि दिल्लीला परतण्यापूर्वी शनिवारी आणि रविवारी डीजीपींच्या परिषदेत सहभागी होतील.

मोदींच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त 'झाशी जलसा महोत्सवा'च्या समारोपासाठी पंतप्रधान झाशीत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यूपी डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या झाशी नोड येथे भारत डायनामिक्सच्या पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन करतील आणि मेगा सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करतील.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -

 • आज देवदिपावलीचा पावन पर्व तसंच गुरुनानक जयंतीचा पवित्र दिवस

 • सर्व नागरिकांना याचा शुभेच्छा.

 • दीड वर्षांच्या अंतरानंतर करतारपूर कॉरिडोर नुकताच उघडला, हे सुखावह आहे.

 • केंद्र सरकार नागरिकांचं जीवन सहज बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

 • गुरुनानक साहेब यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

 • गेल्या 50 वर्षांत मी शेतकऱ्यांच्या समस्या खूप जवळून पाहिल्या. त्यामुळेच सत्तेत आल्यापासून कृषि कल्याणाला प्रथम प्राधान्य दिलं.

 • देशातील 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक. त्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. त्यांच्या संख्या 10 कोटींच्या आसपास आहे.

 • या छोट्या जमिनीच्या साहाय्यानेच ते त्यांची शेती करतात. पीढी-दरपीढी कुटुंब वाढेल तसं त्यांची शेती आणखी कमी होत जाते.

 • केंद्र सरकारने 22 कोटी सॉईल हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना दिले.

 • गेल्या चार वर्षांत 1 लाख कोटींपेक्षाही अधिक मदत शेतकरी बांधवांना मिळाली.

 • या सरकारच्या काळात गेल्या कित्येक वर्षांचा उत्पादनाचा विक्रम मोडला.

 • आज केंद्र सरकारचा कृषि बजेट आधीपेक्षा पाच पटींनी वाढला आहे. दरवर्षी सव्वा लाख कोटींपेक्षाही जास्त रुपये कृषि क्षेत्रावर खर्च केले जात आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: PM Narendra Modi To Address Nation and farmer three bill ret
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे