पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिसकाकाचा मृत्यू...

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे (वय ३१, रा. भोसरी) यांचा बुधवारी (ता. २१) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे (वय ३१, रा. भोसरी) यांचा बुधवारी (ता. २१) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.पतंगे हे सध्या पिंपरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. 

नंदकिशोर पतंगे यांच्या छातीत सोमवारू दुखू लागल्याने त्यांना भोसरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी (ता. २१) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

पतंगे हे २०१० मध्ये पोलिस दलात शिपाई पदावर भरती झाले होते. खात्यांतर्गत दिलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर २०१८ मध्ये त्यांची उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. बारामती येथील तापशी हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या निधनामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक! दहा दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिलेल्या महिला पोलिसाचा मृत्यू...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन...

हृदयद्रावक! महिला पोलिस मुलाला उपचारासाठी घेऊन जात असतानाच...

पुणे शहरातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसकाका भास्कर मोढवे यांचे हृदयविकाराने निधन

पोलिसकाका सुनील जंगम यांच्या निधनाने बसला धक्का...

पुणे जिल्ह्यात पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप...

नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कारण समोर...

सांगलीत पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

इमारतीवरून तोल गेल्याने पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू तर...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pimpri chinchwad psi nandkishowr patange passes away heart a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे