पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी वेषांतर करून केली पाहणी...

पोलिस ठाण्यात कर्मचारी खरोखर कसे काम करतात, सामान्य नागरिकांशी कसे वागतात, यासाठी अशा प्रकारे वेषांतर करून अचानक भेट दिली. पिंपरीत वाईट अनुभव होता. मात्र, वाकड व हिंजवडीत चांगला अनुभव आला.

पुणे: पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी वेषांतर करून पोलिस ठाण्यातील 'खाकी' वर्दीच्या कामकाजाची स्वत: अनुभूती घेतली. कृष्णा प्रकाश यांनी वेषांतर केल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. शिवाय, त्यांच्या कामाचे नेटिझन्स कौतुक करत आहेत.

पुणे पोलिस आयुक्तांनी इस्टाग्रामव्दारे साधला नागरिकांशी थेट संवाद!

सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे आणि इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलिस आयुक्तांनी वेषांतर करून नाकाबंदीच्या ठिकाणी आणि तीन पोलिस ठाण्याची बुधवारी (ता. 5) मध्यरात्री पाहणी केली. मात्र, तक्रारदार म्हणून सामोरे गेलेल्या पोलिस आयुक्तांना पिंपरी ठाण्यात पोलिसी खाक्याचा कटू अनुभव आला, तर हिंजवडी, वाकड ठाण्यांमध्ये चांगला अनुभव आला. तक्रारदार पोलिस आयुक्तच असल्याचे समोर आल्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. याप्रकरणात पिंपरी पोलिसांना मेमो बजावणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

चाकणमध्ये दीड लाखांचा गुटखा जप्त; कृष्णप्रकाश यांचा दणका...

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाण्यांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांना कशी वागणूक मिळते, याची परीक्षा पाहण्यासाठी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुधवारी रात्री चक्क मुस्लिम पठाणाचे रूप धारण केले. दाढी चिकटवून डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग चढवला, तसेच सलवार, कुर्ता आणि तोंडावर मास्कही लावला. एवढेच नाही तर त्यांची पत्नी म्हणून सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी तसेच कर्मचारी स्वप्नील खेतले आणि पोलिस आयुक्तांचे वाहनचालक यांनीदेखील वेषांतर केले होते. वेषांतर केलेले हे मुस्लिम दाम्पत्य खासगी टॅक्सी करून रात्री सव्वाबाराला पिंपरी पोलिस ठाण्यात आले. आम्ही पिंपरीतील म्हाडा प्रकल्पात राहत असून, शेजारच्या महिलेला रूग्णवाहिका पाहिजे. मात्र, रूग्णवाहिका चालक पैसे खूप मागतोय. तुम्ही तक्रार दाखल करुन घ्या, अशी विनंती केली. मात्र, तुम्ही तुकाराम चौकात जा, तेथे काय सांगायचे ते सांगा, असे उत्तर उपस्थित कर्मचाऱ्याने दिले. त्यावर इतक्या रात्री कुठे फिरणार येथेच तक्रार दाखल करून करून घ्या, अशी विनवणी करूनही तक्रार दाखल करून घेतली नाही. पोलिस आयुक्तांनी मास्क काढल्यानंतर त्या पोलिसाला अक्षरश: घाम फुटला.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना अश्रू झाले अनावर...

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश त्यानंतर हिंजवडी पोलिस ठाण्यात गेले. आमच्या परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, काही लोकांना बोललो तर त्यांनी बायकोची छेड काढली, मला मारहाण केली, अशी तक्रार हिंजवडी पोलिसांना दिली. त्यावेळी ड्युटीवरील पोलिसाने फिर्याद घेतली. आपण वरिष्ठांना बोलावतो, तोपर्यंत थांबण्याची विनंती केली. काही वेळाने पोलिस आयुक्तांनी ओळख सांगितल्यानंतर कर्मचाऱ्याची भंबेरी उडाली. वाकड पोलिस ठाण्यातही पोलिस आयुक्तांना उपस्थित कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद...

'पोलिस ठाण्यात कर्मचारी खरोखर कसे काम करतात, सामान्य नागरिकांशी कसे वागतात, यासाठी अशा प्रकारे वेषांतर करून अचानक भेट दिली. पिंपरीत वाईट अनुभव होता. मात्र, वाकड व हिंजवडीत चांगला अनुभव आला. यापुढेही अशा प्रकारे अचानक भेट देणार आहे, असे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची जोरदार फलंदाजी...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

इतिहास पोलीस दल निर्मितीचा... (अशोक इंदलकर)

पुणे शहरात घरपोच देवगड आंबा हवा असल्यास 9511 827050 व्हॉट्सऍपवर क्रमांकावर संपर्क करा.

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: pimpri chinchwad police commissioner krushna prakash change
प्रतिक्रिया (1)
 
सदाशिव रामकिशन जाधव
Posted on 7 May, 2021

धंन्येंवाद सर.. सर बातमी ऐकून खुप छान वाटले.जेवडे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.सर मी तुमच्या चलनावर माथा ठेऊन विनंती करतो की अशीच राशन दुकानदार कडे जाऊन चौकशी करा.अणि गोरगरिबांना ज्ञाय द्या.सर सर काही राशन दुकानदार राशन नियमानुसार देत नाही.ऊद्धट भाषा करतात.

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे