'यमभाई' म्हणतो; आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात...'

सोशल मीडियावरील यमभाई पोलिसांपुढे झाला गोगलगाय...

तिसऱ्या पोस्टमध्ये त्याने आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात, असे सांगत थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते.

पिंपरी: हातात कोयते घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा आणि आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात, असे सांगणारा पिंपरी-चिंचवडमधील स्वयंघोषित "यमभाई' पोलिसांपुढे येताच गोगलगाय झाला. ही घटना बुधवारी (ता. 14) घडली.

धक्कादायक! महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थिनीकडे केली शरीर सुखाची मागणी

मयूर अनिल सरोदे ऊर्फ यमभाई (वय 21, रा. दुर्गानगर, निगडी-भोसरी रोड, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे. सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट त्याने टाकल्या होत्या. शिवाय, तिसऱ्या पोस्टमध्ये त्याने आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात, असे सांगत थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते. याबाबत गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कंपनीत ठेका दे नाहीतर महिन्याला खंडणी दे; अन्यथा...

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सध्या सोशल मीडियावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. 15 दिवसांपूर्वी निगडी येथील एका ग्रुपमध्ये अशाच प्रकारे हत्यार घेऊन फोटो टाकणाऱ्यावर गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली होती. सराईत गुन्हेगार अजय काळभोर आणि त्यांच्या साथीदारांवरही गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली. त्याला एक महिन्यासाठी न्यायालयाने निगडीच्या हद्दीतून तडीपार केले होते. त्यानंतर आता पुन्हा सरोदे याच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून हत्यार हातात घेत दहशत निर्माण करणाऱ्यावर पोलिसांनी आपला निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

बापरे! नवऱयाला पत्नीसह मैत्रिणी पाहून फुटला घाम...

चर्चेत! हेमांगी कवी लाटत होती पोळ्या, ट्रोलर्सची नजर नको तिथे...

प्राध्यापकाने 'बाय बाय डिप्रेशन', 'सॉरी गुड्डी' असे फेसबुकवर लिहिले अन्..

महिला डॉक्टरच्या बेडरूममध्ये छुपा कॅमेरा लावणाऱया प्रतिष्ठीत डॉक्टरला अटक

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pimpri chinchwad crime news social media yambhai arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे