पिंपरी-चिंचवडमध्ये दरोडा विरोधी पथकाची गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई...

पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ०३ आरोपींना अटक केली आहे.

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ०३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १७,१२,०२८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखेला यश आले आहे.

पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तांनी पोलिस आयुक्तालयाचे हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. १५/०३/२०२३ रोजी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले, अधिकारी व पोलिस अंमलदार असे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे हद्दीत रात्रगस्त करीत असताना पोलिस उप आयुक्त, परिमंडळ २ यांनी दिलेल्या आदेशान्वये चिखली पोलिस ठाणे कडील पोलिस निरीक्षक राजेंद्र बर्गे व त्यांचेकडील स्टाफसह चिखली पोलिस ठाणे हद्दीत भंगारची दुकाने तपासत होते. यावेळी एक अॅक्सेस मोपेड व टेम्पो अशी वाहने सरकारी वाहने पाहून पळून जावू लागले. त्यांना वरील स्टाफचे मदतीने काही अंतरावर जावुन आरोपी
१) शाकिर शब्बीर अन्सारी, वय - २३ वर्षे, रा- लोहीया नगर, एफ पी ५४, गंजपेठ, पुणे 
२) चाँद गुलाम शेख, वय - ४२ वर्षे, रा- १०५३, भवानी पेठ, एडी कॅम्प चौक, पुणे तसेच अॅक्सेस मोपेडवरील 
३) नफिज शरिफ अहमद अन्सारी, वय - ३४ वर्षे, रा- शिवनेरी नगर, मरियन कॅम्पलेक्स, फ्लॅट नंबर- २०३, आयडीयल बेकरी जवळ कोंढवा, पुणे यांना शिताफिने पकडले. 

सदर वाहनांची तपासणी केली असता, टेम्पो क्रमांक एम एच १२ एस एक्स ०८५३ या मध्ये किं. रू. ९,६८,५२८/- रू चा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ या असुरक्षित आरोग्यास घातक/अपायकारक असा गुटख्याची एकुण २८ पोती मिळुन आली. तसेच अॅक्सेस मोपेड गाडी क्रमांक एम एच
१४ जी टी ०५०४ या मध्ये ४,४३,५००/- रोख रक्कम मिळून आली. सदर गुन्हा करते वेळी वापरलेली २,५०,०००/- रू चा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व कि.रू.५०,०००/- मारुती सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेड असा एकूण मिळुन १७,१२,०२८/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरूध्द चिखली पोलिस ठाणे गुरनं १६८ / २०२३ भा.दं.वि. कलम ३२८,२७२,२७३,१८८ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम ३० (२) (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे, पोलिस सह आयुक्त मनोज लोहीया, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. पोलिस उप आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे-१, पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले, सहा पोलिस निरीक्षक अंबरीष देशमुख, चिखली पोलिस ठाणे कडील पोलिस निरीक्षक राजेंद्र बर्गे, सपोनि नकुल न्यामणे, तसेच पोलिस अंमलदार राहुल खारगे, प्रविण माने, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, प्रशांत सैद, औदुंबर रोंगे तसेच चिखली पोलिस ठाणे कडील किसन वडेकर, शिंदे व घनवट यांचे पथकाने केली आहे.

पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

 

पिंपरी-चिंचवडमध्ये फळविक्री व्यावसायीकाकडून खंडणी उकळणारे ताब्यात...

पिंपरी-चिंचवड पोलिसांची वेश्याव्यवसाय दलालांवर कारवाई; महिलांची सुटका...

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातमधील सराईत सख्खे भाऊ ताब्यात...

देहुरोड पोलिसांनी लाखो रुपये लुटणा-या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या...

वेबसाईटवरून ओळख; लॉजवर नेऊन बलात्कार अन् ऑनलाइन फसवणूक...

चाकण एमआयडीसीतील कंपनीमधील दरोड्याचा पोलिसांनी लावला शोध...​

​पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची गुन्हेगारी विरुद्ध विशेष मोहीम!

पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटी, नो-एंट्री, काळी काच विरोधात पोलिसांची मोठी कारवाई...

पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता हातात घेऊन दहशत घालणाऱयांना केली अटक...

Title: pimpri chinchwad crime news police three arrest for gutkha a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे