पिंपरी-चिंचवडमध्ये महिला डॉक्टरवर ठिकठिकाणी बलात्कार...

विस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून एका महिला होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.

पुणे: विस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून एका महिला होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी 26 वर्षाच्या पीडित महिलेने गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी पंकज अनिल खंडागळे (वय 28 रा. थेरगाव) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

बापरे! नवऱयाने खिडकीतून आत पाहिले अन् झाला मोठा भांडाफोड...

2016 ते 5 मे 2022 या कालावधीत हा प्रकार बालेवाडी, चिंचवड येथील लॉजमध्ये वेळोवेळी घडला आहे. फिर्यादी यांनी गुरुवारी (ता. 5) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पंकज अनिल खंडागळेयाच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला या होमिओपॅथी डॉक्टर असून आरोपी आणि त्यांची कॉलेजमध्ये असल्यापासून ओळख आहे. आरोपीने मैत्रीच्या संबंधातून फिर्यादी यांना बालेवाडी येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्याठिकाणी व्हिस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध केले. महिला बेशुद्ध झाल्यावर आरोपीने त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले.

धक्कादायक! नेपाळी युवकाकडून मायलेकींचा विनयभंग अन् काय म्हणाला पाहा...

आरोपीने पीडित महिलेला व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बालेवाडी आणि चिंचवड येथील लॉजवर बोलावून घेत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याशिवाय पंकज खंडागळे याने पीडित महिलेकडून वेळोवेळी 2 ते 3 लाख रुपये घेतले. मागील काही दिवसांपासून त्याचा भाऊ अखिलेश खंडागळे याच्या गुगल पे वर पैसे पाठवण्यास सांगून पीडित महिलेला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सी.एम. बोरकर करीत आहेत.

दुःखाचा डोंगर! नवविवाहीतेने घेतला जगाचा निरोप...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pimpri chinchwad crime news doctor women regsiter police com
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे