भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या

तालिबानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जगापुढे मांडण्याचे काम दानिश करत होते. हे काम करत असतानाच त्यांची हत्या झाली.

काबूल (अफगणिस्तान): भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश सिद्धीकी यांची हत्या करण्यात आली आहे. ते कंदहार येथे अफगाण स्पेशल फोर्ससोबत राहून फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करत होते.

तालिबानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जगापुढे मांडण्याचे काम दानिश करत होते. हे काम करत असतानाच त्यांची हत्या झाली. दहशतवाद्यांनी अफगाण स्पेशल फोर्सच्या तुकडीवर हल्ला केला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अफगाण स्पेशल फोर्सला प्रतिकार करण्यासाठी वेळ मिळाला नाही. या काळात दहशतवाद्यांनी सिद्धीकी यांची हत्या केली. दानिश रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या दिल्ली ब्युरोतील मुख्य फोटो जर्नालिस्ट होते.

अफगानिस्तानचे राजदूत फरीद ममूनद्जे यांनी दानिश यांची हत्या झाल्याचे ट्विट करून सांगितले आहे. याआधी गेल्या महिन्यात १३ जूनला झालेल्या हल्ल्यातून दानिश थोडक्यात बचावले होते. मुळचे मुंबईकर असलेले दानिश ४० वर्षांचे होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचे वार्तांकन केले आहे. त्यांना पुलित्झर पुरस्कारही मिळाला होता.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: photo journalist danish siddhiqui killed at afganistan kandh
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे