Video: नेपाळमध्ये लँडिंग करताना विमान नदीत कोसळले...

पोखरा येथे विमान लँडिंग करत असताना डोंगराला जाऊन आदळले आणि त्यानंतर हे विमान सेती नदीत कोसळले.

काठमांडू (नेपाळ):  पोखरा येथे विमान लँडिंग करत असताना डोंगराला जाऊन आदळले आणि त्यानंतर हे विमान सेती नदीत कोसळले. विमान दुर्घटनेत आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. विमानातून 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर प्रवास करत आहेत. या दुर्घटनेनंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. 

यति एअरलाइन्सचे ATR-72 हे विमान काठमांडूवरून पोखरा येथे जात होते. त्यावेळी विमान लँडिंग करताना एका डोंगराला जाऊन आदळले. त्यानंतर हे विमान सेती नदीत जाऊन कोसळले. त्यामुळे अचानक विमानाने पेट घेतला. काही क्षणातच आग प्रचंड भडकली. या  अपघातात आतापर्यंत 32 प्रवासी दगावले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेपाळमधील जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे. बचाव कार्य करण्यासाठी नेपाळी सेनाही घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलीस, विमान प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनीही मदतकार्य सुरू केले आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू असल्याने तूर्तास विमानतळ बंद करण्यात आले आहे. तसेच या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, विमान पोखराच्या जवळ पोहोचले होते. मात्र, डोंगराळ प्रदेशात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे ही विमान दुर्घटना घडली असल्याची माहिती पुढे आली आहे.

Live Video! अमेरिकेत दोन लढाऊ विमानांची टक्कर...

टांझानियात विमान तलावात कोसळून 19 जणांचा मृत्यू...​

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: passenger plane of yeti airlines crashed in nepal 32 dead on
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे