धक्कादायक! पोलिसकाकाची गळफास घेवून आत्महत्या...

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृहदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला.

परभणी: येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने घरातील छतावरील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली.

परभणी शहरातील लक्ष्मीनगर भागात राहत असलेले पोलीस शिपाई रामेश्वर दिलीप बारहाते (३५, मुळ गाव सेलू ) पोलीस मुख्यालयात नोकरीस होते. बारहाते यांनी त्यांच्या घरातील छतावरील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब गुरूवारी रात्री १० वाजता उघडकीस आली. याबाबत नानलपेठ पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृहदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला. रामेश्वर बारहाते यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटेनची नानलपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Title: Parbhani crime news police constable suicede register case
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे