पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर...

विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली.

पंढरपूर :  विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला... पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर... आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय अशी हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात घातली.

आषाढी महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून कोलते यांची 'अशी' झाली निवड

शासकीय पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचवेळी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्या पाठीशी: मुख्यमंत्री

सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मंदिरात आल्यानंतर फक्त विठ्ठल रुक्मिणी मूर्तीकडेच आपण पाहत असतो, परंतु मंदिरातील प्रत्येक खांब, प्रत्येक दगड काहीना काहीतरी बोलत असतो. आज मी परंपरेचा वृक्ष लावला. त्यांची पायेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील असा विश्वास ही ठाकरे यांनी व्यक्त केला.याचवेळी मंदिर समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रतिमांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Pandharpur news cm Uddhav Thackeray at vitthal Rukminii
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे