हृदयद्रावक! कारच्या सनरूफमध्ये उभा राहिला अन् मांजाने चिरला गळा...

कारच्या सनरूफमध्ये उभा राहून आठ वर्षीय मुलगा परिसर पाहात होता. अचानक त्याच्या गळ्यावर पतंगाचा मांजा आल्याने त्याचा गळा कापला गेला.

पालघर: एका कारच्या सनरूफमध्ये उभा राहून आठ वर्षीय मुलगा परिसर पाहात होता. अचानक त्याच्या गळ्यावर पतंगाचा मांजा आल्याने त्याचा गळा कापला गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

मुंबईतील कांदिवली येथून रविवारी दिशान तिवारी, त्याचे आजी-आजोबा, आई-वडील, बहीण हे हमरापूर गाळतरे येथे फिरण्यास आले होते. कारमधून फिरत असताना दिशान कारचे सनरूफ उघडून उभा राहून निसर्ग पाहत होता. अचानक पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्यात अडकला आणि त्याचा गळा कापला गेला. उपचारासाठी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रक्तस्राव व गळ्याची नस कापल्यामुळे त्याची प्रकृती अतिगंभीर होत गेली. पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना आई-वडिलांच्या मांडीवरच त्याची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, पुणे शहरात मोटरसायकलवरून जात असताना रस्त्यात आलेल्या पतंगाच्या मांजामुळे एका हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला गेला. श्रीकांत लिपाणे (वय २७) असे त्याचे नाव असून वारजे येथील ढोणेवाडाजवळ रविवारी दुपारी हा प्रकार घडला. श्रीकांत लिपाणे हे मोटरसायकलवरून आईला घेऊन पुनावळे येथून जांभुळवाडीकडे सर्व्हिस रोडने जात होते. ढोणेवाडाजवळ रस्त्यावर अर्धवट लटकलेल्या पतंगाच्या मांजामुळे त्यांचा गळा कापला. नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. याप्रकरणी निखिल गोपीनाथ लिपाणे (जांभुळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हृदयद्रावक! एकाच सरणावर चौघांना निरोप देताना फुटला अश्रूंचा बांध...

हृदयद्रावक! पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही सोडला प्राण...

हृदयद्रावक! चिमुकलीपाठोपाठ आईनेही सोडला प्राण...

हृदयद्रावक! वडिलांपाठोपाठ नेमबाज मोनाली गोऱ्हे यांनीही सोडला प्राण

हृदयद्रावक! जुळे भाऊ एकत्र जन्मले अन् एकत्रच गेलेही...

हृदयद्रावक! सख्ख्या भावांनी दोन तासांच्या अंतरानी घेतला जगाचा निरोप

निशब्ध! तीन सख्ख्या भावंडांचा कोरोनाने मृत्यू...

हृदयद्रावक! दोन्ही देव चोरीला गेले हो, त्यांना कुठे शोधू...

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील तिघांचा अवघ्या तासांत कोरोनाने घेतला बळी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: palghar crime news child stand at car sunroof and kite manja
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे