प्रसिद्ध मॉडेलची घरात घुसून निर्घृण हत्या...

नायब नदीम हिचा विवाह झालेला नव्हता आणि घरात ती एकटीच राहात होती.

कराची (पाकिस्तान): लाहोरमधील एका मॉडेलची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नायब नदीम (वय 29) असे मॉडेलचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

व्हायरल! तिन्ही जुळ्या बहिणी एकाच वेळी गर्भवती...

नायबच्या भावाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, नायबचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय आहे, मात्र शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर कारण समजू शकेल. नायब नदीमचा भाऊ मोहम्मद अली याने सांगितले, 'नायब नदीम हिचा विवाह झालेला नव्हता आणि घरात ती एकटीच राहात होती. शुक्रवारी (ता. 9) मध्यरात्री बहिणीच्या घरी गेल्यानंतर नायबचा मृत्यू झाला झाल्याचे दिसले. ती जमिनीवर कोसळलेली होती. तिच्या मानेवर जखमा होत्या. नायबच्या बाथरुमची खिडकी तुटलेली होती. यामुळे आरोपी याच मार्गाने घरात घुसल्याचा अंदाज आहे.'

टिकटॉकमुळे महिलेसह गेला आईचाही हकनाक बळी...

दरम्यान, मूळची पाकिस्तानची असलेल्या ब्रिटिश महिलेची लाहोरमध्ये मे महिन्यातही हत्या झाली होती. या महिलेचा मृतदेही घरातून ताब्यात घेण्यात आला होता. 25 वर्षीय माया एका लग्नसमारंभासाठी ब्रिटनमधून पाकिस्तानात आली होती आणि आपल्या मैत्रिणीसोबत राहत होती. आरोपींनी घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pakistani model nayab nadeem found dead at home police compa
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे