दोन मैत्रिणींनी एकाच युवकासोबत केलं लग्न; कारण...

शहनाज आणि नूर अशी या दोन युवतींची नावे आहेत. दोघींनी एजाज नावाच्या युवकासोबत विवाह केला आहे.

कराची (पाकिस्तान): दोघी एकमेकींच्या जिवलग मैत्रीणी. पण, लग्नानंतरही त्यांना कायम सोबतच रहायचे होते. त्यामुळे त्यांनी एकाच युवकासोबत लग्न केले आणि लग्नानंतर त्या एकाच घरामध्ये राहत आहेत. पाकिस्तानमधील मुझफ्फरगढ येथील आगळीवेगळी मैत्री आहे.

बापरे! पतीला रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने उचलले मोठे पाऊल...

शहनाज आणि नूर अशी या दोन युवतींची नावे आहेत. दोघींनी एजाज नावाच्या युवकासोबत विवाह केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शहनाजने सांगितले की, एजाज याच्याशी प्रथम माझा विवाह झाला होता. पण, लग्नानंतर प्रिय मैत्रिण नूरपासून दूर गेल्याचे मला दु:ख होते. नूरही कायम आमच्या घरी ये-जा करत होती. याच दरम्यान आपल्या मैत्रिणीसोबत कायम राहता यावे म्हणून नूरने माझ्या पतीशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. नूरचा हा निर्णय मलाही आवडला आणि तिनेही लग्नाला परवानगी दिली. 

प्रचंड फॅन फॉलोइंग पण बेसूर गाणी गातो म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात अन्...

दोन्ही मैत्रिणींनी एकाच युवकासोबत लग्न केले आणि एकाच घरात राहात आहेत. शहनाज हिला दोन मुले असून नूरलाही एक मुलगा आहे. शहनाज म्हणाली, 'एजाजशी माझे भांडण होऊ शकते पण नूरसोबत नाही. कारण मी स्वत:च तिला घरी घेऊन आले आहे. नूरचीही शहनाजबाबत कोणतीही तक्रार नाही.' दरम्यान, आगळ्या-वेगळ्या मैत्रीची आणि विवाहाची राज्यात जोरदार चर्चा आहे.

 

आरोपीला फाशी देताना लाईव्ह टेलिकास्ट करा...

कारागृहातून बाहेर न जाताही महिला कैदी गरोदर; कसे पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

Title: pakistan two girl friend married one youth and together leav
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे