पाकिस्तानमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, 30 जणांचा मृत्यू

मिल्लत एक्स्प्रेस आणि सैय्यद एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेसची एकमेकांना धडक झाली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस आणि अधिकार दाखल झाले आहे.

कराची (पाकिस्तान): पाकिस्तानमध्ये आज (सोमवार) सकाळी मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. डहारकी भागात दोन रेल्वेंची एकमेकांना धडक बसल्याने मोठा अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या दुर्घटनेत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Video: पाकमध्ये पोलिस आणि नौदल कर्मचाऱ्य़ांमध्ये दे दणा दण...

मिल्लत एक्स्प्रेस आणि सैय्यद एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेसची एकमेकांना धडक झाली. दरम्यान, घटनास्थळी पोलिस आणि अधिकार दाखल झाले आहे.

पाकिस्तानच्या घोटकी येथील रेती आणि दहारकी रेल्वे स्थानकांदरम्यान मिल्लत एक्स्प्रेस व सर सय्यद एक्स्प्रेस या दोन गाड्यांची समोरा-समोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. यामध्ये जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. लाहोरच्या दिशेने जाणारी सर सय्यद एक्स्प्रेस गाडी कराचीहून सरगोधाकडे जाण्यासाठी निघाली असताना मिल्लत एक्स्प्रेसला धकड बसून हा अपघात झाला आहे.

बापरे! 'वजनदार' पत्नी अंगावर बसल्याने पतीचा गुदमरून मृत्यू

रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १४ बोगी रुळावरून घसरल्या आहेत. यामध्ये अनेक प्रवासी अद्याप अडकले असून, बचाव कार्य चालू आहे. दरम्यान, जखमींची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pakistan train accident 30 death Sir Syed Express train coll
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे