Video: पाकमध्ये पोलिस आणि नौदल कर्मचाऱ्य़ांमध्ये दे दणा दण...

पोलिस आणि नौदल कर्मचाऱ्य़ांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

कराचीः पाकिस्तानमध्ये पोलिस आणि नौदल कर्मचाऱ्य़ांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

बापरे! 'वजनदार' पत्नी अंगावर बसल्याने पतीचा गुदमरून मृत्यू

कराचीमध्ये एक नौदल अधिकारी आपल्या कुटुंबीयांसोबत समुद्र किनाऱ्य़ावर फिरण्यासाठी बाहेर पडले होते. परंतु, पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या अधिकाऱ्य़ासोबत नौदलाचे काही कर्मचारीही होते. पोलिसांनी या नौदल अधिकाऱ्य़ाची गाडी अडवून विचारपूस केली. तेव्हा नौदल कर्मचाऱ्य़ांनी पोलिसांशी हुज्जत घातली. नंतर पोलिस आणि नौदल कर्मचाऱ्य़ांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

पोलिसांनी नौदल कर्मचाऱ्य़ांना काठीने मारहाण केली, तर नौदल कर्मचाऱ्य़ांनी पोलिसांनी बंदुकीने मारहाण केली. दरम्यान उपस्थित नागरिकांनी याचे व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल केले. या हाणामारीत पोलिस आणि नौदल कर्मचारीही जखमी झाले आहेत.

निश्चय! मरण्यापूर्वी 100 बायका आणि 1000 मुलांना द्यायचा जन्म...

या प्रकरणी कराची पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमध्ये पोलिस आणि सैन्यात हाणामारीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी मे महिन्यातच राजधानी इस्लामाबादमध्ये काही पोलिसांनी एका सैन्य अधिकार्याघला मारहाण केली. कारण हा अधिकारी आपल्या कुटंबीयांसोबत एका रीसॉर्टमध्ये जात होता.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pakistan news police and soldier free style video viral
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे