पाकिस्तानमध्ये पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला...
कराची येथील पोलिस मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.कराची (पाकिस्तान) : कराची येथील पोलिस मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, 19 जण जखमी असून, जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दहशतवाद्यांनी शुक्रवारी पोलिस मुख्यालयावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलs आणि इमारत पुन्हा ताब्यात घेतली. सध्या ही इमारत पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. एकूण तीन हल्लेखोर टोयोटा कोरोला कारमधून केपीओमध्ये पोहोचले. एका हल्लेखोराने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्वत:ला उडवले तर इतर दोन दहशतवाद्यांना पोलिसांवर हल्ला केला. कराची पोलिसांच्या प्रवक्त्यानेही दहशतवाद्यांना ठार केल्याचेही सांगितले. दहशतवादी पूर्ण तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्रसाठा आणि हातगोळे देखील होते. पोलिसांनी संपूर्ण फौज बोलवूनही तीन दहशतवाद्यांनी त्यांना तोडीस तोड उत्तर दिल्याचंही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, दहशतवादी वेगवेगळ्या ठिकाणी बसून ग्रेनेड फेकत होते, आतून गोळीबार करत होते. यापूर्वीही दहशतवाद्यांनी मियांवली पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. पोलिस मुख्यालयाला पोलिस आणि रेंजर्सच्या मोठ्या ताफ्याने वेढा घातला होता. दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात एक बचाव कर्मचारी जखमी झाला असून दोन दहशतवादीही ठार झाले आहेत. बचाव कार्यकर्त्याला कराची येथील जिना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी बचाव कर्मचाऱ्याचे नाव साजिद असून तो ईधी स्वयंसेवक आहे. साजिदला दोन गोळ्या लागल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी कराचीच्या जिना हॉस्पिटलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी कराची पोलुस प्रमुखांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची दखल घेतली ईग्. मुराद अली शाह यांनी उपमहानिरीक्षकांना (डीआयजी) केओपीमध्ये पथके पाठवून हल्लेखोरांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय त्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. कराची पोलिस मुख्यालयावर सुरू असलेल्या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) स्वीकारली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कराची शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ लीक...
पाकिस्तानमध्ये बस-टँकरचा भीषण अपघात, २० जण जागीच ठार...
Video: पाकिस्तानची पहिली हिंदू महिला 'डीएसपी'
पाकिस्तानी पोलिस अधिकाऱयाची प्रेमकहाणी व्हायरल...
इम्रान खान यांची तिसरी बायकोही गेली घर सोडून; कारण पाहा...
पाकिस्तानात दोन गटांमध्ये तुफान गोळीबार; १० जणांचा मृत्यू
संतापजनक! पाकिस्तानमध्ये बकरीवर केला सामूहिक बलात्कार अन्...
Video: पाकिस्तानमध्ये रिक्षात पळत चढून घेतला महिलेचा 'किस'
अमानुष कृत्य! पाकमध्ये चिमुकलीवर बलात्कार करून गुप्तांगावर केले वार अन्...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...