पाकिस्तानात दोन गटांमध्ये तुफान गोळीबार; १० जणांचा मृत्यू

पोलिस आणि निमलष्करी दलांना परिसरात पाठवण्यात आले आहे. जखमींची संख्या जास्त असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

कराची: पाकिस्तानमध्ये दोन गटामध्ये वाद झाला असून, या वादातून झालेल्या गोळीबारात तब्बल १० जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले आहेत. हा वाद आदिवासी भागामध्ये जंगलातील जमिवीवर कब्जा करण्यासाठी झाला असून, यातून हा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम भागात असलेल्या पेशावरपासून २५१ किमी अंतरावर असलेल्या खुर्रम जिल्ह्यातील तेरी मेगल गावात राहणाऱ्या गैदू टोळीच्या नागरिकांनी सरपणासाठी लाकूड गोळा करणाऱ्या पेवार टोळीच्या सदस्यांवर गोळीबार केला. यावेळी दोन्हीकडून मोठी हत्यारे आणि रॉकेल लाँचरचा वापर झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुर्रम जिल्ह्यातील सबडिव्हिजवनमध्ये जंगलातील मालकी हक्कावरून दोन गटांमध्ये वाद आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू शनिवारी तर सहा अन्य लोकांचा मृत्यू पेवार समुदायाच्या नागरिकांना रविवारी केलेल्या प्रतिहल्ल्यात झाला. बंदुकधाऱ्यांनी लपून हल्ला केला. यावेळी दोन्हीकडून मोठी हत्यारे आणि रॉकेल लाँचरचा वापर झाला.

दोन्ही समुदायामधील जेष्ठ व्यक्ती आणि सरकारी अधिकारी गैदू आणि पेवार टोळीमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पोलिस आणि निमलष्करी दलांना परिसरात पाठवण्यात आले आहे. जखमींची संख्या जास्त असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pakistan crime news 10 dead at firing case in two groups pol
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे