Video: संसदेत पोटखाजव्या मंत्र्यावर अभिनेत्रीची टीका
माणूस बना बैल बनू नका' खाज येत असेल तर नक्की खाजवा मात्र जनतेच्या मनात आदर असलेल्या जागीतरी अशारितीने खाजवू नका.कराचीः पाकिस्तानच्या संसदेत बसून ढेरी खाजवत असताना मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री मथिरा हिने टीका केली आहे. संबंधित व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका केली आहे.
पाकमध्ये महिला पोलिस उपनिरिक्षकाने अखेरची इच्छा लिहीली आरशावर...
व्हिडीओमध्ये पाकिस्तानमधील राजकीय पक्ष पीएमएल-एन या पक्षाचे चौधरी जामिल हे शर्ट वरती करून पोट खाजवताना दिसत आहेत. मंत्र्याचा व्हिडीओ पाहून हसायला येतंच शिवाय किळसही वाटत असल्याचे नेटिझन्सने म्हटले आहे.
Lmao scenes from Pakistan national assembly. pic.twitter.com/VCerB9AzsM
— A🐺 (@this_my_handle) April 17, 2022
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, पाकिस्तानच्या संसदेत बसून ढेरी खाजवत आहेत. ढेरी खाजवत असताना त्यांनी आपला सदरा वर केला आहे. आपले नगाऱ्यासारखे दिसणारे पोट खराखरा खाजवताना पाहून अनेकांना किळस वाटली होती. पाकिस्तानी अभिनेत्री मथिरा हिने जमिल यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे. तिने म्हटले की 'खाज येणं सामान्य गोष्ट आहे, मात्र कसं खाजवावे हे कृपया दाखवू नका. माणूस बना बैल बनू नका' खाज येत असेल तर नक्की खाजवा मात्र जनतेच्या मनात आदर असलेल्या जागीतरी अशारितीने खाजवू नका. मी कोणाची खिल्ली उडवत नाहीये मात्र सार्वजनिक ठिकाणी असं वागणारी व्यक्ती ही जनावराप्रमाणेच आहे.'
पाकमध्ये बलात्कार करून शिर कापणाऱयाला शिक्षा; काय ती पाहा...
इम्रान खान यांची तिसरी बायकोही गेली घर सोडून; कारण पाहा...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...