उस्मानाबाद पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या...

उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक म्हणून श्रीमती नीवा जैन (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-1, पुणे ते पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद) येथे झाली आहे.

उस्मानाबाद : राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने त्यातच उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांची सुद्धा बदली (पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद ते पोलिस उपायुक्त, मुंबई शहर) येथे झाली आहे. त्यांच्या ठिकाणी उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक म्हणून श्रीमती नीवा जैन (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-1, पुणे ते पोलिस अधीक्षक, उस्मानाबाद) येथे झाली आहे.

राज्यातील पोलिस अधिकाऱयांच्या बदल्या; पाहा नावे...

अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांची बदली पोलिस अधीक्षक दहशतवादी पथक औरंगाबाद येथे झाली असून, त्यांच्या जागी सहायक पोलिस अधीक्षक लोणावळा पुणे येथील नवनीत कुमार कॉवत यांची बदली उस्मानाबाद अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे.

गणेशोत्सव! राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर...

उस्मानाबाद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांची सहायक पोलिस आयुक्त, ठाणे शहर येथे झाली आहे. तर भूमचे उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांची अप्पर पोलिस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद येथे बदली झाली आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: osmanabad police officer transfer new sp neeva jain and othe
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे