पोलिसकाका अन् पोलिस दीदीही जाणार आता शाळेत...
शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलिसकाका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत.उस्मानाबाद : शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलिसकाका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत.
सरपंच ग्रामसेवकासह पाच जणांवर गुन्हे दाखल; काय केले पाहा...
नुतन जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून कळंब येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला होता. कम्युनिटी पोलिसिंग योजनेंतर्गत जिल्हा पोलिस दलातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या मध्ये सायबर क्राईम, अमली पदार्थ दुष्परिणाम, पोस्को कायदा, ऑनलाईन फसवणूक, महिलांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, मुलांमध्ये गुड आणि बॅड टच आदी संदर्भात माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे.
धक्कादायक! पती भोळसर असल्याने सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार
महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याकरिता पोलिस विभागाकडून ‘पोलिसकाका, पोलिसदीदी’ हा उपक्रम सुरु केला आहे. यामुळे आता प्रत्येक शाळेत पोलिसांचा पहारा असणार आहे. तसेच या पोलिसांकडे विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी यांच्याकडे करता येणार आहेत. पोलिसांच्या या उपक्रमाचे पालकांकडून तसेच शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून स्वागत होत आहे. लहान मुलं तसेच शाळकरी विद्यार्थिनींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना, रॅगिंग, छेडछाड, इतर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने नवीन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअतंर्गत प्रत्येक शाळेत एक पोलिस पुरुष कर्मचारी म्हणजेच पोलिसकाका आणि महिला कर्मचारी म्हणजेच पोलिसदीदी अशी दोघांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्हावासीयांना पोलिस प्रशासनाचे आवाहन...
उस्मानाबाद जिल्ह्यात काही दिवसांतच सकारात्मक बदल दिसतीलः अतुल कुलकर्णी
उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक पदी अतुल कुलकर्णी
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...