पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी पुरस्काराने सन्मानीत...

प्रेम प्रकरणातून झालेल्या खुणाचा पुरावा नसताना फक्त मुलीच्या कुर्त्यावरील लेबल च्या आधारे आरोपी पर्यंत पोहचून त्यांच्या मुसक्या आवळून गुन्ह्याची उकल करण्यात त्यांना यश मिळाले आहे.

उस्मानाबाद : पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी या बाबतचे प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? आरोग्यमंत्री काय म्हणाले पाहा...

प्रेम प्रकरणातून झालेल्या खुणाचा पुरावा नसताना फक्त मुलीच्या कुर्त्यावरील लेबल च्या आधारे आरोपी पर्यंत पोहचून त्यांच्या मुसक्या आवळून गुन्ह्याची उकल करण्यात त्यांना यश मिळाले आहे.

सातारच्या पोलिस अमंलदाराच्या धाडसाचे होतेय सर्वत्र कौतुक...

या बद्दल सविस्तर माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यात वाघोली येथे डिसेंबर २०१५ मध्ये विहिरीत एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या नंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली होती. या मध्ये ओळख पटवणे अतिशय अवघड असताना राजतिलक रौशन यांनी तिच्या अंगावर असणाऱ्या कुर्त्यावरील लेबल टॅगवरून ऑनलाईन फ्लिपकार्ट कंपनीकडून, असे कुर्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांची यादी व मोबाईल नंबर घेऊन त्या सर्व मोबाईलचे लोकेशन तपासले. एका मोबाईलचे वाघोली लोकेशन आढळले. फक्त एवढ्याच माहितीवरून मयत व आरोपीची ओळख पटवून तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असता तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 

संतोष जाधव यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर...

आय आय टी शिक्षण घेतलेल्या राजतिलक रौशन यांनी आधुनिक शिक्षणाचा वापर करत गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी मोबाईल कंपनी यांनी दिलेली फोन कॉलची माहिती आणि कुर्त्यावरील लेबल या वरून पूर्ण गुन्ह्याची उकल केल्याने त्यांची दखल घेत त्यांना हा सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी पुरस्कार पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिला आहे.

डीवायएसपी नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: osmanabad news ips raj tilak roushan awarded by apradhsidhi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे