व्हॉटस्ॲप ग्रूपवर महिलेची बदनामी करणारा मजकूर टाकणे भोवले

संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

उस्मानाबाद :  व्हॉटस्ॲप ग्रूपवर महिलेची बदनामी करणारा मजकूर टाकणे भोवले आहे. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! कौंटुंबिक वादातून हत्या, आत्महत्या अन्...

व्हॉटस् ॲपवरून बदनामीकारक मजकुर पसरविल्याप्रकरणी जिल्ह्यातील तुळजापूर तालूक्यातील एका व्यक्तीने गावातीलच एका महिलेचा नामोल्लेख करुन ही महिला फक्त 500 ₹ मध्ये धंदा करत असून तीचा प्रियकर तिला ग्राहक शोधून देत आहे. असा बदनामीकारक मजकुर असलेला संदेश गावातील 3 व्हाट्सॲप ग्रुपवरून 16 नोव्हेंबर रोजी प्रसारीत केला, अशा मजकुराच्या संबंधीत महिलेच्या पतीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम - 500, 501 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम - 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: osmanabad crime news women viral message on whatsapp group
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे