उस्मानाबादेत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुलींची सुटका...

पोलिसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या त्या 4 महिलांची सुटका केली आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरात वेश्या व्यवसाय करणार्‍या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उस्मानाबाद शहरातील सरिता हॉटेल व बावर्ची हॉटेल येथे पोलिसांनी धाड टाकून 5 मुलींची सुटका केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

उस्मानाबाद शहरातील सरिता हॉटेल व बावर्ची हॉटेल येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. 16) या दोन्ही हॉटेलवर बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली. सरिता हॉटेल येथून 4 मुलींची तर बावर्ची हॉटेल येथून एका मुलीची सुटका करण्यात आली.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांसह पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. सप्टेंबर रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उस्मानाबाद शहरात आले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्यालगत ‘हॉटेल सरिता’ चे चालक आपल्या हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत. यावर पथकाने बनावट ग्राहकास तेथे पाठवून मिळालेल्या माहितीची खात्री करुन 19.45 वा.सु. ‘हॉटेल सरिता’ येथे छापा टाकला असता हॉटेलच्या पाठीमागील खोल्यांमध्ये 4 प्रौढ महिला (नाव- गाव गोपनीय) आढळून आल्या. महिला पोलिसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक एक 49 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) असून ती त्या 4 महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करुन त्यांच्यावरती उपजिवीका करीत असल्याचे समजले. यावर पथकाने त्या हॉटेल चालक महिलेस अटक करुन तीच्या ताब्यातील एक मोबाईल फोन व 4,500  रुपये रोख रक्कम असा माल हस्तगत केला. पोलिसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या त्या 4 महिलांची सुटका करुन हॉटेल चालक महिलेसह हॉटेल मालक या दोघांविरुध्द उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 287 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 370, 370 अ (2) सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4 , 5 अंतर्गत नोंदवला आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश, पोनि - के.एस. पटेल, उस्मान शेख, पोउपनि - चाटे, सपोफौ - कऱ्हाळे, महिला पोहेकॉ - पुरी, पोना - सांगळे, राऊत, शेख, महिला पोना - जाधव, पोकॉ - अंभुरे, खांडेकर, साळुंके, जमादार, पाडे यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष’ (ए.एच.टी. सेल) चे प्रभारी पोनि - के.एस. पटेल हे करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेची जुगार विरोधी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त...

उस्मानाबादमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; पाहा १० आरोपींची नावे...

कळंब पोलिसांची अवैध गुटखा विरोधी कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त...

बालसुधार गृहातील मुले पळवणारी टोळी जेरबंद: पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी

Video: आरटीओ अधिकारी म्हणून महामार्गावर वाहने अडवणारी टोळी गजाआड...

चिमुकलीच्या गुप्तांगावर करणाऱ्याला पोलिस कोठडी; यापूर्वीही त्याने...

संतापजनक! चिमुकलीवर शेतात बलात्कार अन् गुप्तांगावर वार...

धक्कादायक! प्रेमसंबंध नाकारल्याने मैत्रिणीच्या नवऱयाने केला खून...

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवले; शेवटच्या जबाबात म्हटले...

हृदयद्रावक! चिमुकला चेडूंसारखा १५ फूट वर उडाला अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: osmanabad crime news police raid on lodge and four women and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे