तुम्हाला एक लाख रक्कमेचे कर्ज मंजूर झाले आहे...

ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपीला बिहारमधून अटक

मी रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असून, तुम्हाला 1,00,000 रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे.

उस्मानाबाद : 'मी, रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असून, तुम्हाला एक लाख रक्कमेचे कर्ज मंजूर झाले आहे,' अशा प्रकारची भूलथापा देऊन सकनेवाडी येथे एकाला ३० हजार रुपयाला गंडा घालणाऱ्या आरोपीस बिहारमधून अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

राज कुंद्रा याच्याबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा...

शरद नामदेव सिरसाठ (रा. सकनेवाडी, ता. उस्मानाबाद) यांना 29.12.2020 रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला होता. त्या कॉलवरील व्यक्तीने 'मी रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असून, तुम्हाला 1,00,000 रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे.' असे सिरसाठ यांना सांगून कर्ज प्रक्रीयेसाठी त्यांच्याकडून एकूण 30,299 रुपयांची रक्कम त्या कॉलवरील व्यक्तीने सांगीतलेल्या बँक खात्यात भरण्यास सांगून सिरसाठ यांची फसवणूक केली होती. यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 268 / 2020 हा भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) प्रमाने दाखल आहे.

पोलिस निरीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...

गुन्हा तपासात सायबर पो.ठा. च्या पोनि- श्रीमती अर्चना पाटील, पोहेकॉ- कुलकणी, पोना- संजय हालसे, राहुल नाईकवाडी, गणेश जाधव, पोकॉ- आकाश तिळगुळे, मकसुद काझी, अनिल भोसले, सुनिल मोरे, गणेश हजारे, विमल पौळ, नलावडे, अपेक्षा खांडेकर यांच्या पथकाने आरोपीच्या मोबाईल क्रमांकाच्या तसेच बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषन केले असता हा गुन्हा राहुल कुमार लखन प्रसाद लहेरी (वय 21, रा. भागलपुर, राज्य बिहार) याने केल्याचे निष्पन्न झाले.

संरपंचांची ऑनलाईन फसणूक करणारा ठकबाज ताब्यात...

या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोउपनि- अनिल टोंगळे, पोहेकॉ- किशोर रोकडे, पोकॉ- गणेश खैरे, बळीराम घुगे यांच्या पथकाने भागलपुर, राज्य बिहार येथे 7 दिवस तपास करुन आरोपी राहुल कुमार यास अटक करुन मंगळवारी (ता. 20) उस्मानाबाद येथे आणले. सदर गुन्ह्याचा उर्वरीत तपास सायबर पो.ठा. च्या पोनि- श्रीमती अर्चना पाटील या करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: osmanabad crime news cyber crime one arrested at bihar for h
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे