धक्कादायक! लग्न समारंभासाठी जाताना अपघात; पती-पत्नी ठार

अपघात भरधाव वेगाने गाडी चालवताना वाहनावरील ताबा सुटल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उस्मानाबादः तुळजापूर तालुक्यातील गंधोरा पाटी येथे लग्न समारंभासाठी जात असताना अपघात होऊन पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, ११ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. 

धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये वाट पाहताना अचानक मृतदेह आला समोर...

सचिन भावसार (वय ४०) आणि राणी भावसार (वय ३४) मुलगा कौस्तुभ भावसार (वय ११  रा. देऊळगाव राजा ह.मु. औरंगाबाद). तिघे औरंगाबादहून गुंजोटी (ता. उमरगा) येथे लग्नसमारंभासाठी पहाटे एम एच २० सी एस ०६७० या चार चाकी वाहनातून निघाले होते. सकाळी ०८.३० वा. सुमारास गंधोरा पाटीजवळ एका झाडावर गाडी धडकली. यात पती पत्नी दोघांचा मृत्यू झाला असून, मुलगा कौस्तुभ याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात भरधाव वेगाने गाडी चालवताना वाहनावरील ताबा सुटल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

पोलिस दलातील भरतीदरम्यान कॉपीचा भलताच प्रकार...

धक्कादायक! कौंटुंबिक वादातून हत्या, आत्महत्या अन्...

या वेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे धनंजय वाघमारे, हवालदार कांबळे, काळे, चालक बारकुल आदींनी मयत पती-पत्नीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून, गंभीर दुखापत झालेल्या मुलाला तुळजापूर येथे उपचारासाठी नेण्यात आला आहे. महामार्ग पोलिस मदत केंद्र नळदुर्ग चे सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड आणि नळदुर्ग पोलिस स्टेशन पुढील तपास करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: osmanabad crime news accident near tuljapur husband wife dea
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे