किम जोंग उन यांनी नवीन वर्षाच्या सुरवातीलाच दिला दणका...
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी नवीन वर्षाची सुरुवात क्षेपणास्त्र चाचणीने केली आहे.प्यॉंगयांग (उत्तर कोरिया): उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी नवीन वर्षाची सुरुवात क्षेपणास्त्र चाचणीने केली आहे. उत्तर कोरियाने आज (रविवार) सकाळी मध्यवर्ती भागात क्षेपणास्त्राची चाचणी केली, हे क्षेपणास्त्र 400 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यात यशस्वी ठरले.
किम जोंग उन यांनी उत्तर कोरिया वर्षभर अण्वस्त्रांची संख्या वाढवण्यासाठी जोमाने काम करेल अशी शपथ यावेळी घेतली. किम जोंग यांनी आपल्या देशाच्या आण्विक शस्त्रागाराचा विस्तार करण्यासाठी आणि सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करण्याचा आदेश जारी केला आहे.
'मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रे बनवण्याची गरज आहे. किम जोंग अण्वस्त्रांची संख्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. किम यांची महत्त्वाकांक्षी आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रणाली जलद प्रत्युत्तर देणारे आण्विक हल्ल्यांचे लक्ष्य आहे.
किम यांच्या हालचाली त्यांच्या अण्वस्त्र विकास कार्यक्रमाच्या व्यापक दिशेच्या अनुषंगाने आहेत. किम जोंग या वर्षी शस्त्रास्त्रांची चाचणी सुरू ठेवणार आहेत. बैठकीत किम म्हणाले, 'सध्या उत्तर कोरियाला आपले सार्वभौमत्व, सुरक्षा आणि मूलभूत हितसंबंधांची पूर्ण हमी देण्यासाठी लष्करी ताकद वाढवण्याची गरज आहे.' किम जोंग यांनी दक्षिण कोरियावर "अतार्किक आणि धोकादायक शस्त्रे तयार करण्यावर झुकत" असल्याचा आरोप केला. किम यांनी युद्धभूमीवर सामरिक अण्वस्त्रांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याची गरज अधोरेखित केली आणि देशाच्या आण्विक शस्त्रागारात वेगाने वाढ करण्याचे आवाहन केले.
हुकूमशाह किम जोंग उनकडून दोन विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा; कारण...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...