पाकिस्तानमध्ये रात्री १० नंतर लग्न करण्यास बंदी; कारण पाहा...
पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमध्ये रात्री 10 नंतर लग्न समारंभावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.कराची: पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमध्ये रात्री 10 नंतर लग्न समारंभावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार (ता. ८) पासून हा निर्णय लागू झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार ही बंदी लागू करण्यात येत आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
पाकिस्तानमध्ये युवतीच्या बाबतीत घडली धक्कादायक घटना...
पाकिस्तानमधील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर शाहबाज सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानावर आर्थिक संकटानंतर आता वीज संकटही कोसळले आहे. पाकिस्तानने विजेचा वापर कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत आणि आता इस्लामाबादमध्ये रात्री 10 नंतर लग्न समारंभांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, लग्नातील पाहुण्यांना फक्त एकच डिश देण्याची परवानगी असेल आणि या नवीन निर्बंधाबाबत अधिसूचना जारी केली जाईल. या बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी इस्लामाबाद पोलीस आणि प्रशासनाला कळवण्यात आले आहे. उल्लंघन केल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असे प्रसारमाध्यमांनी सांगितले.
Video: संसदेत पोटखाजव्या मंत्र्यावर अभिनेत्रीची टीका
पंतप्रधान शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यात सरकार ऊर्जा संकटाला कसे सामोरे जाऊ शकते यावर चर्चा करण्यात आली. कारण जनतेला तासनतास वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि गॅसच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे विजेच्या तुटवड्याचा सामना करण्यासाठी वीज विभागाने ऊर्जा संवर्धन योजना सादर केली आणि वित्त विभागानेही एक योजना सादर केली. शुक्रवारी घरातून काम करण्याची परवानगी आणि बाजार लवकर बंद करण्याच्या सूचना आहेत.
पाकमध्ये महिला पोलिस उपनिरिक्षकाने अखेरची इच्छा लिहीली आरशावर...
पाकमध्ये बलात्कार करून शिर कापणाऱयाला शिक्षा; काय ती पाहा...
इम्रान खान यांची तिसरी बायकोही गेली घर सोडून; कारण पाहा...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...