धक्कादायक ! लग्नानंतर 'तू मला पसंत नाहीस' असे म्हणाला अन्...

लग्नानंतर काही दिवसांतच 'तू मला पसंत नाहीस...' असे म्हणून सरफराज आणि सासरच्या मंडळींकडून नवविवाहितेचा छळ सुरू केला.

बीड: एका नवविवाहित महिलेचा छळ करुन मग तिला पेटवून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मामला परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! लग्न समारंभासाठी जाताना अपघात; पती-पत्नी ठार

येथील सरफराज मोमीन नावाच्या मुलाचा गेल्या महिन्यातच विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच 'तू मला पसंत नाहीस...' असे म्हणून सरफराज आणि सासरच्या मंडळींकडून नवविवाहितेचा छळ सुरू केला. यानंतर पीडित महिलेने हा प्रकार आपल्या माहेरच्यांनाही सांगितला. मग दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये चर्चाही झाली. शुक्रवारी सरफराज याने पत्नीला तोंडी तलाक दिला. यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत पत्नीवर पेट्रोल ओतले आणि मग तिला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित महिलेचे कुटुंबीय घटास्थळी दाखल झाल्याने त्यांनी मुलीचे प्राण वाचवले. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये वाट पाहताना अचानक मृतदेह आला समोर...

पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पती सरफराज आणि त्याच्या इतर कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Newly wedded wife sets on fire by husband in beed police reg
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे