राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली असून, बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु, रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन करून गाळप केल्याने बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम 188अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले. मात्र, त्यांच्या अहवालात विसंगती आढळल्याने लेखापरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर 8 मार्च 2023 रोजी भिगवण पोलिसांत बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या मंत्री समितीच्या निर्णयानुसार 15 ऑक्टोबरनंतर ऊस गाळप हंगाम सुरू करावयाचा होता. परंतु, बारामती ॲग्रोने 10 ऑक्टोबर 2022 रोजी हंगाम सुरू केला, अशी तक्रार दाखल झाल्यानंतर अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी 7 डिसेंबर 2022 मध्ये चौकशी अहवाल सादर केला. त्यामध्ये बारामती ॲग्रो या साखर कारखान्याने मंत्री समितीच्या निर्णयाचे व साखर आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकाचे उल्लंघन केल्याचा ठपका गुळवे यांच्यावर ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
बारामतीत 'मुळशी पॅटर्न'चा थरार; अजित पवार भडकले...
रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील वक्तव्य करणाऱयाला अटक; पाहा नाव...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.