नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अडचणीत वाढ...

नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला तुमचा जामीन का रद्द करू नये, असा सवाल करत मुंबई सत्र न्यायालयाने नोटीस जारी केली आहे.

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला तुमचा जामीन का रद्द करू नये, असा सवाल करत मुंबई सत्र न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. यामुळे राणा दांपत्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

राणा दाम्पत्याचा मुक्काम कारागृहातच; कारण...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणे प्रकरणी राणा दांपत्याचा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलण्याची मनाई केली होती. पण, लीलावती रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या विरोधात सरकारी वकिलांनी तक्रार केली होती. या प्रकरणी आज (सोमवार) सुनावणी पार पडली. न्यायालयाचा अवमान केल्याची ही तक्रार केली होती. प्रसार माध्यमांशी बोलू नये अशी अट घातली असतानाही राणा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Video: नवनीत राणांच्या आरोपांवर मुंबई पोलिस आयुक्तांकडून पुराव्यासकट प्रत्युत्तर

'तुमचा जामीन का रद्द करू नये, असा सवाल सत्र न्यायालयाने उपस्थितीत केला आहे. तसेच, राणा दाम्पत्यांना नोटीस जारी केली आहे. या नोटीसानुसार १८ मेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मूभा दिली आहे.

Video: खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: navneet rana and ravi rana court sent notice for bail be can
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे