Video: टोल भरण्यावरून महिला एकमेकांशी भिडल्या...

टोल नाक्यावर टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल कर्मचारी महिला यांच्यात तुंबळ हाणामारी झाली आहे.

नाशिक: पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल कर्मचारी महिला यांच्यात तुंबळ हाणामारी झाली आहे. या मारामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत पुण्याला जात होते. पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्वत:चे शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली. त्यावर टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरवाच लागेल, कार्ड चालणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सीआरपीएफ जवानाच्या पत्नीमध्ये आणि टोल कर्मचारी महिलेमध्ये बाचाबाची झाली आणि काही वेळातच त्याच रूपांतर थेट हाणामारीत झाले.

पिंपळगाव टोलनाका नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असतो. अनेक वेळा टोलनाक्यावरील कर्मचारी अरेरावीची भाषा वापरतात, दमदाटी करतात, असा आरोप वाहन चालकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी तर थेट नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचीच गाडी टोल कर्मचाऱ्यांनी अडवली होती. त्या विषयावर सचिन पाटील आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता, तेव्हा ही सबंधित पिंपळगाव पोलिस ठाण्यात टोलनाका कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टोल नाक्यावरील या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पिंपळगाव पोलिस दाखल झाले. त्यावेळी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी टोल कर्मचाऱ्याने केली. यावर पोलिसांनी दोन्ही तक्रादारांच्या बाजू ऐकली आणि सबुरीचा सल्ला दिला. दोन्ही बाजूकडून पोलिसांनी यावेळी माफीनामे लिहून घेतले आणि या प्रकरणावर पडदा टाकला.

जवान चंदू चव्हाण यांनाही टोल नाक्यावर अनेकदा अनुभव आला आहे. जवानांना सुद्धा टोल नाक्यावर अनेकदा अडवले जाते. शिवाय, ताटकळत ठेवले जात असल्याच्या घटना घडत आहेत.

Video: पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले प्रकरणी डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले...

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! पोलिस मुख्यालयाच्या गेटवरच पोलिस कर्मचाऱ्याचा खून...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: nashik pimpalgaon baswant toll plaza fight between two women
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे