भारत-पाक सीमेवर लढणाऱया जवानाला मारण्याची धमकी...

ज्ञानेश्वर संपत कापडी हे अकरा वर्षांपासून लष्करात सेवा करत आहेत. सध्या ते जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहेत.

नाशिकः भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर ज्ञानेश्वर संपत कापडी (रा. देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे लढत असून, गावातील नागरिकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सीमेवर लढणारा जवान झगडतोय न्याय मिळण्यासाठी...

ज्ञानेश्वर संपत कापडी (रा. देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे अकरा वर्षांपासून लष्करात सेवा करत आहेत. सध्या ते जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहेत. देशवंडी येथे त्यांचे आई-वडील राहात आहेत. त्यांचे वडील आजाराने त्रस्त आहेत. त्यांची गावात शेती आहे. पण, त्यांच्या शेतीवर बबन कचरू कापडी यांनी अतिक्रमन केले आहे. ज्ञानेश्वर कापडी यांनी कायदेशीर मोजणी पण केली आहे. पण, स्थानिक प्रशासन व पोलिस त्यांना मदत करत नसून, अतिक्रमन करणाऱयालाच मदत करत आहे. शिवाय, आई-वडिलांना त्रास देत आहे, अशी तक्रार जवान ज्ञानेश्वर कापडी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली होती. 

Video: जवानांचे तब्बल १८ हजार फूट उंचीवर योगासन...

शेतीबाबत सुरू असलेला वाद मिटवून घ्या, नाहीतर तू सुट्टीवर आल्यावर तुला संपवून टाकू, आम्ही तुझी नोकरी घालवू, तुझे कोर्ट मार्शल करून, अशी धमकी निवृत्ती पांडुरंग कापडी, संतोष बबन कापडी, बबन कचरू कापडी यांनी धमकी दिली आहे. याबाबत जवान ज्ञानेश्वर कापडी यांनी इ-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली असून, त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.

Video: भारतीय जवानांची हटके परेड एकदा पाहाच...

दरम्यान, मला व माझ्या परिवारातील कोणत्याही सदस्याला काही झाले तर त्याची जबाबदारी स्थानिक पोलिस प्रशानसनावर राहिल, असे जवान ज्ञानेश्वर कापडी यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ तयार करून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सीमेवर उभे राहून देशसेवा करणाऱया जवानाला न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून मांडत आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: nashik news indian soldier dnyaneshwar kapadi in jammu kashm