नाशिकमध्ये व्यायाम करताना गच्चीवरून पडून महिलेचा मृत्यू...

नाशिकमध्ये अशोकस्तंभ परिसरात प्रिया या कुटुंबासोबत राहत होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी उठून व्यायाम आणि योगा करण्यासाठी गच्चीवर गेली होती.

नाशिक :  व्यायाम करताना गच्चीवरून पडल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रिया सतीश मटुमल असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात कबड्डीपटू मुलीचा खून; आरोपीला अटक

नाशिकमध्ये अशोकस्तंभ परिसरात प्रिया या कुटुंबासोबत राहत होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी उठून व्यायाम आणि योगा करण्यासाठी गच्चीवर गेली होती. गच्चीवर व्यायाम सुरू असताना अचानक तोल गेला. गच्चीवरून थेट खाली कोसळली. प्रिया व्यायाम करत होती, तिथे कठडा नसल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यायाम करताना अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती गच्चीवरून थेट खाली पडली.  या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रियाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केले. 

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: nashik crime news women fall down in building and dead
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे