पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत आरोपीची काढली धिंड...
पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. शिवाय, नागरिकांनी टाळ्या वाजवत पोलिसांचे कौतुक केले आहे.नाशिक : नाशिक शहरातील सातपुर परिसरात आरोपीची पोलिसांनी धिंड काढली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. शिवाय, नागरिकांनी टाळ्या वाजवत पोलिसांचे कौतुक केले आहे.
नाशिक शहरातील सातपुर कॉलनी परिसरात जवळपास दहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सातपूर पोलिसांनी संशयित युवकाला सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत अटक केली. शिवाय, सातपुर परिसरात त्याची पोलिसांनी धिंड काढली आहे. काही तासातच सातपुर पोलिसांनी संशयित आरोपी आकाश जगताप याच्या मुसक्या आवळून कारवाई केल्याने पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
सातपुरच्या कॉलनी परिसरात मध्यरात्रीच्या दरम्यान मद्यपान करून फिरत असताना नशेत वाहनांची तोडफोड केल्याची कबुली संशयित आरोपीने दिली आहे. संशयित आरोपी आकाश निवृत्ती जगताप हा एमएच बी कॉलनीतील रहिवासी असून सातपुर परिसरातच त्याची नाशिक शहर पोलिसांनी धिंड काढली आहे.
सातपुर परीसरात वाहन तोंडफोडीच्या घटणेने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती, त्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केल्याने नागरिकांनी टाळ्या वाजवत पोलिसांचे कौतुक केले आहे.
पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...
'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com
Video: पुणे शहरात कोयता घेऊन फिरणाऱयाची पोलिसांनी काढली धिंड...
Video: पोलिसांनी गावगुंडाची रस्त्यावरून काढली धिंड...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.