शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट करणारा पोलिसांच्या ताब्यात...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध निखिल भामरे नावाच्या युवकाने आक्षेपार्ह ट्वीट केले होते.

नाशिकः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध निखिल भामरे नावाच्या युवकाने आक्षेपार्ह ट्वीट केले होते. याविरोधात कारवाई करावी असे ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यानंतर निखिल भामरे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, दिंडोरी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. 

अभिनेत्री केतकी चितळे हिची वादग्रस्त पोस्ट; गुन्हा दाखल...

जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या निखिल भामरेच्या ट्वीटच्या स्क्रिनशॉमध्ये 'वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची' असा मजकूर लिहिलेला आहे. निखिल भामरे याच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, काय पातळी वर हे सगळे होते आहे. या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा. या ट्वीटमध्ये आव्हाडांनी मुंबई, महाराष्ट्र पोलिसांनी टॅग केले आहे.

रूबी हॉल क्लिनिक किडनी तस्करी प्रकरणात मोठी कारवाई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडल विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे या युवकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कलम 153 कलम 107 कलम 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून राज ठाकरे यांच्यासाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे ट्रोल होत आहे. केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

अनिल देशमुख यांची मागणी न्यायालयाने फेटाळली; त्यामुळे...

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: nashik crime news ncp leader sharad pawar and youth twitt ag
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे