धक्कादायक! मुलाच्या गुप्तांगाला रबर बांधून दिले चटके...

घरगुती कारणातून रागाच्या भरात सावत्र आईने लहानग्याचा अमानुष छळ केला. या महिलेने मुलाच्या गुप्तांगाला चटके दिले.

नाशिक : एका सावत्र आईने अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाला रबर बांधून चटके दिले. वडील कामावर गेल्यानंतर आईने या अल्पवयीन मुलाचा छळ केला. या प्रकरणी सावत्र आईविरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा

निळवंडी पाडे (ता. दिंडोरी( गावातील ही घटना आहे. घरगुती कारणातून रागाच्या भरात सावत्र आईने लहानग्याचा अमानुष छळ केला. या महिलेने मुलाच्या गुप्तांगाला चटके दिले. मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलाचे शोषण केल्याप्रकरणी आईविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

SVS Aqua कंपनीत मृत्यू झालेल्या 17 जणांची नावे आली समोर...

दरम्यान, या घटनेनंतर सावत्र आईच मुलाला घेऊन रुग्णालयात आली. मुलाला चटके दिल्याचा आरोप तिने फेटाळला आहे. हा लहानगा आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये भांडण झाले त्यातून ही घटना घडली आहे, असा दावा महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. मुलाची सावत्र आई ही त्याची मावशीच आहे. पत्नीच्या पश्चात मुलांचा चांगला सांभाळ व्हावा यासाठी वडिलांनी त्या मुलांच्या मावशीसोबतच लग्न केले आहे. परंतु मावशीनेच मुलावर अमानुष अत्याचार केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: nashik crime news minor boy tourcher police register compla
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे