बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बनावट नोटा जप्त

टोळीकहून एक लाख ४५ हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या एकूण २९१ नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत.

लासलगाव (नाशिक) : शहर व परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका डॉक्टर महिलेसह पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकहून एक लाख ४५ हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या एकूण २९१ नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 

नाशिकमध्ये व्यायाम करताना गच्चीवरून पडून महिलेचा मृत्यू...

लासलगाव परिसरात नकली नोटा चलनात आणल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मोहन बाबुराव पाटील, प्रतिभा बाबुराव घायाळ, विठ्ठल चपांलाल नाबरीया, रविंद्र राऊत, विनोद पटेल यांना अटक केली आहे. लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांच्या विरुध्द भादवि कपोलिस 48 9 क, ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पुणे शहरात कबड्डीपटू मुलीचा खून; आरोपीला अटक

१२ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे लासलगाव येथील मोहन बाबुराव पाटील व डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ (दोघे रा. बोराडे हॉस्पिटलजवळ लासलगाव) व विठ्ठल चपलाल नाबरीया (रा. कृषीनगर, कोटमगाव रोड लासलगाव ता. निफाड) यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आमचा मित्र रवींद्र हिरामण राऊत, रा. स्मारक नगर, पेठ व विनोद मोहनभाई पटेल (रा. पंचवटी, नाशिक) हे आम्हाला सायंकाळी बनावट ५०० दराच्या चलनी नोटा देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

तलावातली मोटार काढली बाहेर; पण वेळ निघून गेली होती...

या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सपोउनि राजेंद्र अहिरे पोलीस हवालदार बाळू सांगळे, पोलीस नाईक कैलास महाजन, योगेश शिंदे, संदीप शिंदे, पोका प्रदीप आजगे, गणेश बागूल, कैलास मानकर, सागर आरोटे, देविदास पानसरे, महिला पोलिस शिपाई मनीषा शिंदे यांचे पथक तयार करून या पथकाने येवलारोड विंचूर येथे सापळा रचून ताब्यात घेतले. पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पोउनि रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: nashik crime news fake indian currency notes racket busted i
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे