पॅरोलवर सुटलेल्या माजी सरपंचाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ...

नारायणगव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नगर: पारनेर (जि. नगर) तालुक्यातील नारायणगव्हाण सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कांडेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले व सध्या पॅरोलवर सुटका झालेले नारायणगव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांना बघून जुगार अड्ड्यावर सुरू झाली पळापळ पण...

राजाराम शेळके हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी शेळके हे एकटेच होते. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्यावर मारेकर्‍यांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्यात त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

धक्कादायक! मुलीच्या वडिलांना व्हिडिओ पाहून बसला जबरदस्त धक्का...

याबाबत हकीकत अशी की, १३ नोव्हेंबर २०१० रोजी पुणे-नगर रोडवरून नारायणगव्हाण शिवारातून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी डोक्यात गोळ्या झाडून प्रकाश कांडेकर यांची हत्या केली होती. या हत्येमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. कांडेकरांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता त्यांच्या डोक्यातील गोळी गायब करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक अशोक रजपूत यांनी १४ आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी चौकशी अंती राजाराम शेळके मुख्य सुत्रधार म्हणून सिद्ध झाले होते.

धक्कादायक! बारगर्लसोबत नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल...

राजाराम शेळके हे दहा वर्षापूर्वी नारायाणगव्हाणचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी होते. त्यांच्यासह कांडेकर खून प्रकरणात आणखी काही आरोपी होते. राजाराम शेळके आणि त्यांच्या मुलाला या गुन्ह्यात शिक्षा लागली होती. कोरोना संसर्ग वाढल्याने त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. पॅरोलची सजा उपभोगत असताना त्यांनी गावातील शेतात काम चालू केले होते आणि हे काम चालू असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शेळके यांचा खून म्हणजे बदला घेतल्याचाच प्रकार असल्याची चर्चा झडत आहे.

मेव्हणीच्या प्रेमसंबंधाबाबत समजल्यावर दाजीने उचलले मोठे पाऊल...

दरम्यान याप्रकरणी मागील घटनेचा काही संबंध आहे का याबाबत सुपा पोलिस तपास करत आहेत. सध्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सुपा पोलिसांनी सांगितले.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: narayangavan former sarpanch rajaram shelke murder supe
प्रतिक्रिया (1)
 
SANTOSH KHUDE
Posted on 12 June, 2021

Unknown

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे