धक्कादायक! विद्यार्थिनीने वसतिगृहात घेतला गळफास; कारण...

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नांदेड : वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता कदम (रा. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. नांदेडच्या श्री गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई यांत्रिकी शाखेत तिसऱ्या वर्षात शिकत होती. गीता कदम ही दोन दिवसांपासून बेपत्ता होती. 21 सप्टेंबर रोजी गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहामधील एका खोलीत रात्री 11 वाजेच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पंख्याला दोरी लावून तिने गळफास घेतला होता. त्यानंतर वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. घटनास्थळावर एक सुसाईट नोट आढळली आहे. वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून गीताने आत्महत्या केल्याची सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे. 

'गुडबाय लाईफ' असा स्टेटस ठेवला अन् घेतला धक्कादायक निर्णय...

धक्कादायक! घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत शिरला अन् पुढे...

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! पोलिस मुख्यालयाच्या गेटवरच पोलिस कर्मचाऱ्याचा खून...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: nanded crime news engineering student geeta kadam suicide a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे