नागपूरमधील थरार नाट्य दीड तासानंतर संपुष्टात...

एक बंदुकधारी व्यक्ती थेट एका बिल्डर राजू वैद्य यांच्या घरात शिरला आणि घरातील नागरिकांना ओलिस ठेवले होते. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.

नागपूर: नागपूर शहरातील पिपला भागात आज (शुक्रवार) दुपारी सुरू झालेला थरार दीड तासानंतर संपुष्टात आला. पोलिसांनी ओलिसांची सुटका केली असून, बंदुक धारी व्यक्तीला अटक केली आहे.

गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मारेकऱ्याला अटक; कृष्ण प्रकाश यांचे कौतुक...

एक बंदुकधारी व्यक्ती थेट एका बिल्डर राजू वैद्य यांच्या घरात शिरला आणि घरातील नागरिकांना ओलिस ठेवले होते. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल दीड तासानंतर पोलिसांनी मोठ्या शिथाफीने बंदुकधारी व्यक्तीच्या ताब्यातून राजू वैद्य कुटूंबियांची सुटका केली.

धक्कादायक! प्रेयसीची हत्या केल्यानंतर घेतला चार जणांचा जीव...

मिळालेल्या माहितीनुसार, लुटीच्या उद्देशाने हा तरुण बिल्डर राजू वैद्य यांच्या घरात शिरला होता. त्याने बंदुकीचा धाक दाखवत घरातील नागरिकांना बंधक बनवले होते. त्यानंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी करू लागल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी मोठ्या चतुराईने या कुटुंबाची सुटका केली. बंदुकधारी घरात शिरल्याची माहिती अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी बघ्यांनीही मोठी गर्दी झाली होती. बाहेर बघ्यांची गर्दी आणि आतमध्ये बंदुकधाऱ्याने कुटुंबाला ओलीस केलेल्यांची सुटका करणे, असे दुहेरी टास्क पोलिसांसमोर होते. पण, पोलिसांनी योग्य पद्धतीने हाताळल्याने पुढील दुर्घटना टळली.

धक्कादायक! विवाहित प्रेयसीला रात्रीच्या वेळी भेटायला बोलावले अन्...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: nagpur gunman arrested by police who made hostages in custod
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे