'तू मेरा गेम करने वाला है, ऐसा सुना है' असे म्हणाला अन्...
'तू मेरा गेम करने वाला है, ऐसा सुना है' असे म्हणत आरोपीसोबत वाद झाला होता. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.नागपूर: दारू विक्रीच्या वादातून चेतन अंकुश मोहर्ले या युवकाची (वय २२) हत्या झाली आहे. चेतन आणि आरोपी हे दोघेही अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत होते. त्याच दारू विक्रीतून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहारमधील ८० जणांना रांजणगाव MIDC कंपनीचे दिले 'जॉईनिंग लेटर' पण...
चेतन याचा अवैध दारूचा धंदा होता आणि त्या ठिकाणी आरोपी हा नेहमी जात असे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने चेतनकडे जाणे बंद केले होते. मात्र, यामुळेच चेतन हा संतप्त झाला होता. बुधवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी आपल्या मित्रांसोबत बसला होता. त्यावेळी चेतन तेथे आला आणि 'तू मेरा गेम करने वाला है, ऐसा सुना है' असे म्हणत आरोपीसोबत वाद झाला होता. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...
अल्पवयीन असलेल्या आरोपीने चाकूने चेतनच्या पोटावर वार केला. या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला आणि तो रस्त्यावर कोसळला. यानंतर चेतनच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान चेतनचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
येरवडा कारागृहात गेल्यामुळे झाला हाकनाक त्रास अन् बदनामी पण...
स्वारगेटजवळ मध्यरात्री मोटारीत दोन वेळा बलात्कार; दोन तासात अटक...
मुसेवाला हत्या प्रकरणी संतोष जाधववर पुणे पोलिसांची कारवाई...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...