पोलिसांनी तब्बल १४ वर्षांनंतर काढले सत्य बाहेर...

रणजीतच्या पत्नीवर त्याची नजर पडली. विशालने तिच्याशी मैत्री केली. काही दिवसांनंतर दोघांची मैत्रीपूर्ण संबंध घट्ट झाले.

नागपूर : कुख्यात डॉन रणजीत सफेलकरच्या गँगमधील एका युवकाची नजर फिरली आणि त्याने चक्क रंजीत सफेलकरच्या बायकोशी मैत्री केली. याबाबत माहिती मिळताच सफेलकरने युवकाला कारने चिरडून ठार करीत ‘गेम’ केला. विशाल पैसाडेली (वय २८, रा. कामठी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विशालच्या हत्याकांडाला आज १४ वर्षे झाले असून, उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, हे विशेष.

Video: प्रवाशांनी भरलेली एसटी पाण्यात कोसळली...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामठी येथील रहिवासी विशाल पैसाडेली हा रणजीत सफेलकर आणि कालू हाटेच्या गॅंगमध्ये काम करीत होता. तो नेहमी रणजीत सोबत राहत असल्यामुळे त्याला घरात केव्हाही प्रवेश होता. या दरम्यान रणजीत सफेलकरच्या पत्नीवर त्याची नजर पडली. विशालने तिच्याशी मैत्री केली. काही दिवसांनंतर दोघांची मैत्रीपूर्ण संबंध घट्ट झाले. दोघांच्या मैत्रीची कुणकुण रणजीतला लागली. त्यामुळे त्याने विशालचा गेम करण्याचे ठरविले.

बनावट मार्कलिस्ट तयार करणाऱया टोळीला एलसीबीकडून बेड्या

विशाल आणि पत्नीच्या मैत्रीला संपविण्यासाठी विशालचा खून करण्याचा कट रचला. २३ मार्च २००७ रोजी कालूच्या माध्यमातून विशालला घरी बोलावले. तेथे दारू पाजल्यानंतर कामठी छावणीच्या वारेगाव पुलावर नेले. तेथे त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्याला रस्त्यावर झोपवून स्कॉर्पिओने चिरडले. त्यानंतर मृतदेहाला १० फूट खोल जागेत फेकून दिला. या प्रकरणात खापरखेडा पोलिस ठाण्यात काही पोलिस अधिकाऱ्यांना 'मॅनेज' करीत अपघाताचा गुन्हा दाखल करून त्यात बनावट व्यक्तीला आरोपी वाहनचालक म्हणून अटक करण्यात आली होती.

बापरे! गुप्तधनासाठी पत्नीचाच देणार होते नरबळी; तेवढ्यात...

रणजीत सफेलकरला मनीष श्रीवास हत्याकांडात गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनात क्राईमच्या युनिट चारचे सहायक पोलिस निरीक्षक ओम सोनटक्के यांच्या पथकाने याचा तपास करून १४ वर्षांनंतर सत्य बाहेर काढले. यात रंजीत सफेलकर टोळीने योजनाबद्ध पद्धतीने हा खून घडविल्याचा खुलासा झाला. हा तपास अहवाल ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना पाठविण्यात आला होता. त्याप्रमानेच खापरखेडाचे पोलिस निरीक्षक भटकर यांनी सावनेर न्यायालयात हा अहवाल सादर केला. त्या आधारे न्यायालयाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची परवानगी दिली.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: nagpur crime news after 14 year police trace murder case and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे