नवविवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने उडाली खळबळ...

सहा महिन्यांपूर्वी पुजा हिचा विवाह झाला होता. पण तिच्या सासरच्यांनी वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप पुजाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.

नगर : पढेगाव (ता. कोपरगाव) परिसरात एका विहिरीमध्ये विवाहितेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वीच या युवतीचे लग्न झाले होते. तिच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या मंडळींवर आरोप केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! सामूहिक बलात्कारासह अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

पुजा सागर मापारी (वय 24) या विवाहितेचा मृतदेह आज (गुरुवार) सकाळी पढेगाव परिसरातील विहिरीत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुजा हिचे लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. पण अचानक तिच्या मृत्यूमुळं संशयाचं वाचावरण निर्माण झाले आहे. पुजा हिने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. मात्र, तिच्या माहेरच्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. उलट त्यांनी या प्रकरणी पुजाच्या सारच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात कोणतेही पत्र, चिठ्ठी आढळलेली नाही.

धक्कादायक! सुनेने विळ्याने वार करून केली सासूची हत्या

सहा महिन्यांपूर्वी पुजा हिचा विवाह झाला होता. पण तिच्या सासरच्यांनी वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप पुजाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. पैशाची मागणी करत तिच्यावर अनेकदा मानसिक आणि शरीरिक छळ झाल्याची तक्रारही तिच्या माहेरच्यांनी केली आहे. त्यामुळे आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात केल्याचा आरोप सासरच्यांवर केला आहे.

पोलिसांनी मोटार थांबवून झडती घेतली असता बसला धक्का...

या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर करक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्व घटनेची माहिती घेतली असून, मृत्यू नेमका कसा झाला, आत्महत्या आहे की घातपात याचा तपास घेण्यास सुरुवात केली आहे. कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव करत आहेत.

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: nagar crime news newly married girl found in well family mem
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे